घरमहाराष्ट्रपुणेपाकिस्तान झिंदाबाद व्हिडीओप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

पाकिस्तान झिंदाबाद व्हिडीओप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

Subscribe

पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अतिशय शुल्लक गुन्हे दाखल करून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली होती.

पुणे : पुण्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी अतिशय शुल्लक गुन्हे दाखल करून पीएफआयच्या कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी विरोधकांकडून जोर धरू लागली होती. या माग्णीची दखल घेऊन अखेर पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात देशद्रोहाचे नवीन कलम दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निर्देशांनंतर पोलिसांनी पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर कलम 153, 124, 109, 120 ब नव्याने दाखल केले आहेत.

दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे आणि दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) देशभरात छापेमारी करीत पीएफआयच्या 106 कार्यकर्त्यांना अटक केली. राज्यातही एनआयए आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करीत पुण्यातून पीएफआयच्या पदाधिकार्‍यांना अटक केली. पुणे जिल्ह्यात पीएफआयचे मुख्य कार्यालय असल्याने या कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी आंदोलन केले होते. हे आंदोलन करताना पीएफआयच्या कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणाबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सुरुवातीला पुणे पोलिसांनी यावर मौन बाळगले होते, पण सोशल मीडियातून हा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली. सुरुवातीला पोलिसांकडून केवळ दंगल घडवणे, रस्ता अडवणे, प्रक्षोभक नारेबाजी आदी प्रकरणी गुन्हे दाखल करीत ताब्यातील कार्यकर्त्यांना सोडून दिले होते, परंतु नंतर विरोधकांच्या वाढत्या दबावानंतर अखेर त्यात देशद्रोहाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

व्हिडीओचा फॉरेन्सिक तपास

पोलिसांकडून सोशल मीडियावर उपलब्ध व्हिडीओ एकत्र करून त्याचा फॉरेन्सिक तपास करण्यात येणार आहे. ज्या गोष्टी तपासातून निष्पन्न होतील त्यानुसार नवीन कलमांचा समावेश केला जाईल. दोषींवर कठोर कारवाई होईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.

- Advertisement -

पीएफआयवरील बंदीसंदर्भातील निर्णय केंद्राचा

महाराष्ट्रात आणि भारतात पाकिस्तानी नारेबाजी खपवून घेणार नाही. आम्ही अशी घोषणाबाजी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलीस आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीएफआयचा तपास मागील काही वर्षे सातत्याने सुरू होता. पुरावे गोळा करण्यात येत होते. मी मुख्यमंत्री असताना राज्यातील त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. पीएफआयवरील बंदीसंदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय करेल. -देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

ही कलमे नव्याने दाखल

पुण्यात पीएफआयच्या आंदोलकांवर कलम १५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळ आणणे, १२४ देशाबद्दल अपशब्द बोलणे, देशद्रोह गुन्हा , कलम १०९ अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य करणे, कलम १२० ब अतंर्गत कट रचणे असा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -