घरमहाराष्ट्रआमदार संतोष बांगर यांच्या कारवर शिवसैनिकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

आमदार संतोष बांगर यांच्या कारवर शिवसैनिकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

Subscribe

राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या कारवर अमरावती येथे काही शिवसैनिकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे.

अमरावती : राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या कारवर अमरावती येथे काही शिवसैनिकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले असताना अंदाजे 7 ते 8 शिवसैनिकांनी आधी संतोष बांगर यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कार न थांबल्याने शिवसैनिकांनी मागून पळत जाऊन कारच्या काचेवर हात मारले. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके, एकदम ओक्के, अशा घोषणादेखील दिल्या.

संतोष बांगर हे हिंगोलीतील कळमनुरी मतदारसंघातील आमदार आहेत. शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीतअसताना संतोष बांगर यांनी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली होती, परंतु विश्वासदर्शक ठरावावेळी भूमिका बदलून बांगर शिंदे गटात सामील झाले होते. शिंदे गटात दाखल होणारे ते शेवटचे आमदार होते.

- Advertisement -

याआधी काही दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या कारवर पुण्यातील कात्रज येथे हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गटातील तणावात आणखीन वाढ झाली होती. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले की राडा होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच गणेश विसर्जनाला प्रभादेवीत दोन्ही गटांत राडा झाला होता. यावेळी शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला होता.

कारला टच तरी करून दाखवा – संतोष बांगर

- Advertisement -

माझ्या कारला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नाही. जे आमच्याविरोधात घोषणाबाजी करून आमच्यावर हल्ले करण्यास चिथावणी देत आहेत, त्यांच्या घरासमोर मी माझी कार लावायला तयार आहे. माझ्या कारला साधे टच जरी करून दाखवले तरी मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान आमदार संतोष बांगर यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -