घरCORONA UPDATECoronavirus : भारतीय पोस्टाचा वैद्यकीय उपकरणे पोहोचविण्यात महत्वाचा वाटा!

Coronavirus : भारतीय पोस्टाचा वैद्यकीय उपकरणे पोहोचविण्यात महत्वाचा वाटा!

Subscribe

भारतीयांना आवश्यक अशी औषधे पोहोचवण्याचे कामही पोस्टाकडून करण्यात आले आहे.

भारतीय पोस्टाकडून लॉकडाऊनच्या कालावधीत आपत्कालीन सेवा म्हणून अतिशय महत्वाची अशी कामगिरी पार पाडण्यात आली आहे. देशभरात जवळपास ६ हजार किलो मेडिकल उपकरण पाठवण्याचे काम यशस्वीरीत्या या कालावधीत पार पाडण्यात आले आहे. तसेच भारतीयांना आवश्यक अशी औषधे पोहोचवण्याचे कामही पोस्टाकडून करण्यात आले आहे. एकट्या आझाद नगर पोस्ट ऑफिसमधून जवळपास १ हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्युपमेंट किट्स ही देशातील सर्व हॉस्पिटलला पाठवण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे कमीत कमी कालावधीत जलद गतीची अशी सेवा देत ही किट्स पोहोचविण्यात आली आहेत.

‘कोविड १९’ सोबतच्या लढाईत काम करणारी महत्वाची वैद्यकीय उपकरणे पोहचती करण्यातही भारतीय पोस्टाने महत्वाचा वाटा उचलला आहे. चेन्नई ते मुंबई दरम्यान काही महत्वाची उपकरणे ही या कालावधीत पोहच करण्यात आली. तसेच पुण्यातील हॉस्पिटलला सॅम्पलची संख्या वाढवण्यासाठीची मशीन ही अमेरिकेतून आणण्यासाठीही मुंबई जीपीओने महत्वाची कामगिरी बजावली आहे. या उपकरणाच्या जलदगतीने झालेल्या डिलिव्हरीमुळे चाचणीदरम्यानच्या चुका कमी करण्यासाठी अतिशय मोठी मदत झाली.

- Advertisement -

जेष्ठ नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी मुंबईतील सर्व पोस्टाच्या कार्यालयातून पेंन्शन घरोघऱी पोहचवण्यात येत आहे. त्यामुळे घरबसल्या लोकांना पेंशन घरी मिळत आहे. नागरिकांसाठी सेवेत आणखी एक पाऊल उचलत मोबाईल पोस्ट ऑफिसची सुरूवात मुंबईत करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांना तत्काळ सेवा मिळावी हा उद्देश ठेवण्यात आला आहे. मुंबईतील धारावीत लोकांना ही सेवा देताना नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

मुंबई उपनगरातील काही ठराविक हॉस्पिटल हे पुर्णपणे या कालावधीत सुरू आहेत. तसेच नागरिकांना सेवा देण्यासाठी याठिकाणचा संपुर्ण कार्यालयीन कर्मचारी वर्ग अविरत सेवा करत आहे. लोकांच्या सुविधेसाठीच पोस्टाच्या एटीएमची सुविधाही नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -