घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus: भारतीय अभियंत्यांनी बनवले ६० पट स्वस्त व्हेंटिलेटर

Coronavirus: भारतीय अभियंत्यांनी बनवले ६० पट स्वस्त व्हेंटिलेटर

Subscribe

जगातील २०० हून अधिक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या साथीने ५० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेत या विषाणूने कहर केला आहे. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि अभियंते यांचे पथक लोकांना विषाणूंपासून वाचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. या संकटाच्या परिस्थितीत अमेरिकेलादेखील भारतीय अभियंत्यांनी बनवलेल्या व्हेंटिलेटरबाबत खात्री पटली आहे. हे व्हेंटिलेटर सध्याच्या व्हेंटिलेटरपेक्षा ६० पट स्वस्त आहे.

अमेरिका सध्या कोरोना विषाणूचा गड बनला आहे. येथे दोन लाखाहून अधिक लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. अमेरिकन सरकारपासून तज्ज्ञांपर्यंत अनेकांनी अमेरिकेत एक लाख मृत्यूचा अंदाज व्यक्त केला आहे. या संकटाच्या घटनेत अमेरिकेला किमान सात लाख व्हेंटिलेटरची कमतरता भासू लागली आहे. या परिस्थितीत मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) सह भारतीय अभियंत्यांनी स्वस्त वेंटिलेटर तयार केले आहेत.

- Advertisement -

या व्हेंटिलेटरची किंमत ५०० अमेरिकन डॉलर्स आहे, जे भारतीय चलनानुसार अंदाजे ३७ हजार ५०० रुपये आहे. अमेरिकेमध्ये सध्या वापरल्या जाणार्‍या व्हेंटिलेटरची किंमत २२.५० लाख रुपये इतकी आहे. याचा अर्थ भारतीय अभियंत्यांनी बनवलेले नवीन व्हेंटिलेटर हे सध्याच्या व्हेंटिलेटरपेक्षा ६० पट स्वस्त आहे.

अमेरिका म्हणते हा प्रयोग गेम चेंजर

अंतिम चाचणीनंतर पुढील काही आठवड्यांत अमेरिकेने ११ वेगवेगळ्या कंपन्यांनी व्यावसायिक उत्पादनासाठी तसेच कार आणि विमान बनविण्याऱ्या कंपन्यांनाही हे व्हेंटिलेटर तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाबद्दल अमेरिकेचे कार्यवाहक सहाय्यक सचिव लिस जी. वेल्स म्हणाले की कोरोना विषाणूविरूद्ध लढ्यात भारतीय युवा अभियंत्यांचा हा प्रयत्न गेम चेंजर असल्याचे सिद्ध होईल. आम्हाला विश्वास आहे की हा प्रयोग यशस्वी होईल आणि आम्ही लवकरच मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू करू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -