घरमहाराष्ट्रInternational Women's Day: महिला दिनानिमित्त तुमच्या मुलीला बनवा स्वावलंबी; 'या' योजनेत करा...

International Women’s Day: महिला दिनानिमित्त तुमच्या मुलीला बनवा स्वावलंबी; ‘या’ योजनेत करा गुंतवणूक

Subscribe

International Women’s Day: आज 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय महिला दिनी तुम्ही तुमच्या मुलीची स्वप्ने सत्यात उतरवण्याची शपथ घेऊ शकता. ज्यानंतर तुम्ही मुलीच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या काळजीतून पूर्णपणे मुक्त व्हाल. कारण तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेत फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीला स्वावलंबी बनवू शकता.जर तुम्ही तुमच्या मुलीचा जन्म होताच तिच्या नावावर सुकन्या योजनेंतर्गत खाते उघडले तर ती 21 वर्षांची होईपर्यंत तिच्या खात्यात 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होईल. (International Women s Day Make your daughter self reliant on Women s Day Invest in this scheme)

तुम्हाला एकरकमी 15 लाख रुपये मिळणार

जर तुमची मुलगी 1 वर्षांची असेल तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत तिच्या नावावर खाते उघडू शकता. तसेच, जर तुम्ही दरमहा 3000 रुपये वाचवले, तर मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 15 लाख रुपयांचा मोठा निधी दिला जाईल. तसंच, जर तुम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 8 मार्चपासून ही योजना सुरू केली तर 8 मार्चपर्यंत 2025 तुम्हाला 36,000 रुपये जमा होतील. 21 वर्षात ही रक्कम 5,40,000 रुपये होईल. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत दरवर्षी 7.6 टक्के दराने व्याज मिळते.

- Advertisement -

याप्रमाणे 15 लाख रुपये जमा होतील

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही सुमारे 5,40,000 रुपयांची एकूण मूळ रक्कम जमा कराल. ज्यावर दरवर्षी 7.6 टक्के दराने व्याज मिळते. त्यामुळे वार्षिक चक्रवाढीनुसार, रक्कम 9,87,637 रुपये होईल. 21 वर्षांच्या मुदतीनंतर, दोन्ही रक्कम जोडून तुम्ही एकूण 15,27,637 रुपयांचे हक्कदार व्हाल. म्हणजेच तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर, त्या वेळी जर तिला शिक्षण किंवा लग्नासाठी निधीची गरज असेल, तर कोणाशीही संपर्क साधण्याची गरज नाही, इतके पैसे तुम्ही जमा केलेले असतील.

(हेही वाचा: Chandrashekhar Bawankule : तुम्हाला हाही दिवस राजकीय वाटतो, बावनकुळेंचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -