घरक्राइमAbhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे

Abhishek Ghosalkar : अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास गुन्हे शाखेकडे

Subscribe

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दहिसरचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची काल गुरुवारी (ता. 08 फेब्रुवारी) रात्री हत्या करण्यात आले. दहिसर-बोरिवली येथील सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले मॉरिस नोरोन्हा यांनी फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच घोसाळकरांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. घोसाळकरांची हत्या केल्यानंतर मॉरिसने गोळ्या झाडत आत्महत्या केली. घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे. (Investigation of Abhishek Ghosalkar’s murder to Crime Branch)

हेही वाचा… Ghosalkar Murder: ‘आय किल्ड अभिषेक’, माॉरिस ओरडला; वाचा गोळीबाराचा थरार

- Advertisement -

काल रात्री 7.30 वाजताच्या सुमारास मॉरिस नोऱ्होना याने अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या घालून हत्या केली. या हत्येचा फेसबुक लाइव्हमुळे चित्रीत झाला आहे. अभिषेक घोसाळकर हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र असून ते माजी नगरसेवक आहेत. या घटनेनंतर बोरिवली, दहिसरसह संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कारवाईला सुरुवात केली. पोलिसांच्या विविध पथकांकडून या घटनेचा तपास करण्यात येत असतानाच आता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येणार आहे.

आज शुक्रवारी (ता. 09 फेब्रुवारी) पहाटे या हत्येप्रकरणी आरोपी मॉरिस नोऱ्होना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत त्यानेही आत्महत्या केल्याने त्याच्या पत्नीचा जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मॉरिस नोऱ्होना हा सामाजिक कार्यकर्ता असला तरी त्याच्यावर बलात्कार, खंडणी यांसारखे गुन्हे होते. ज्यामुळे तो गुंड प्रवृत्तीचा असल्याची माहिती आता समोर आली आहे. एक वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्याविरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

- Advertisement -

मॉरिस आणि अभिषेक यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद होते. मात्र, या दोघांमधील वाद मिटल्याचे सांगितले जात होते. त्यातच गोळीबाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी हे दोघे एकत्र दिसले. मॉरिसने गुरुवारी आपल्या कार्यालयाबाहेर साडी वितरण कार्यक्रम ठेवला. घोसाळकर देखील तिथे पोहोचले. त्या दोघांनी गळाभेट घेतली. वाद मिटवून नेते एकत्र आल्याने कार्यकर्त्यांनी देखील आनंद व्यक्त केला. आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने साडेसातच्या सुमारास फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना कार्यालयात नेले. लाइव्हमध्ये देखील चांगली कामं करण्यासाठी आम्ही मतभेद बाजूला करून एकत्र आल्याचे दोघांनी सांगितले. हेच आता बाहेर जाऊन कार्यकर्त्यांसमोर सांगूया, गॉड ब्लेस यू, असं म्हणत अभिषेक घोसाळकर उठले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या गेल्या. यातून सावरायचा वेळही त्यांना मिळाला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -