घरक्राइमDahisar Firing: मॉरिस म्हणायचा, ''मी अभिषेकला सोडणार नाही''; मॉरिसच्या बायकोचा पोलिसांना जबाब

Dahisar Firing: मॉरिस म्हणायचा, ”मी अभिषेकला सोडणार नाही”; मॉरिसच्या बायकोचा पोलिसांना जबाब

Subscribe

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने गोळ्या झाडात हत्या केली. त्यानंतर त्यानेही आत्महत्या केली. या सगळ्या घडामोडींनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना जबाब दिला असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अभिषेक घोसाळकर बद्दल मॉरिसच्या मनात खूप राग होता. मी अभिषेकला सोडणार नाही, असं तो नेहेमी म्हणायचा, असं त्याच्या पत्नीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

हेही वाचा : Ghosalkar Murder: ‘आय किल्ड अभिषेक’, माॉरिस ओरडला; वाचा गोळीबाराचा थरार

- Advertisement -

घोसाळकर आणि मॉरिस यांनी गुरुवारी फेसबुक लाइव्ह केले. लाइव्ह संपवून निघताना मॉरिस याने घोसाळकरांवर गोळ्या चालवल्या, आणि नंतर स्वतःलाही गोळ्या मारत आत्महत्या केली. या हत्येचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मॉरिस याच्या घरातील म्हणजे त्याची पत्नी आणि मुलगी परदेशात असल्याचे, सांगितले जात होते. पोलिसांच्या एका टीमनं मॉरिसच्या पत्नीची चौकशी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच घटस्फोट झालेल्या मॉरिसच्या पत्नीनं पोलिसांकडे धक्कादायक खुलासा केला आहे.

मॉरिसच्या पत्नीने पोलिसांना सांगितले की, “मी अभिषेकला सोडणार नाही, त्याला संपवणारच असं मॉरिस अनेकदा म्हणायचा. पण मॉरिसच्या बोलण्याकडं मी लक्ष दिलं नाही.” मॉरिसला बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. तो जवळपास चार, साडे चार महिने तुरुंगात होता. तुरुंगातून तो जामिनावर सुटला. आपल्या अटकेमागे अभिषेक घोसाळकर यांचा हात आहे अशी त्याची समजूत होती, आणि त्याचाच राग मॉरिसच्या मनात होता.

- Advertisement -

हेही वाचा : Bhujbal on Fadnavis : यात गृहमंत्री काय करणार? फडणवीसांच्या मदतीला धावले भुजबळ

मॉरिसने एका व्यक्तीला पैसे दिले होते. ते पैसे परत मिळाले नाही तेव्हा मॉरिसने त्याच्या पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केली. या प्रकरणात महिलेने अभिषेक यांची मदत घेत मॉरिसविरोधात तक्रार दिली होती. मॉरिस परदेशातून भारतात परतताच त्याला विमानतळावरून बलात्कार प्रकरणी अटक झाली होती. या प्रकरणी तो तुरुंगात होता. आपल्याला अटक करण्यासाठी अभिषेक घोसाळकरांनी दबाव टाकल्याचा मॉरिसचा समज होता. त्यातूनच दोघांमध्ये टोकाचे वैर निर्माण झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

आयसी कॉलनीमध्ये सध्या प्रभाग एकमध्ये अभिषेक घोसाळकर यांची पत्नी नगरसेवक आहेत. यावेळी मॉरिस निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होता. याच राजकारणाच्या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. याशिवाय अभिषेकने आपल्याला गुन्ह्यात गोवल्याचं मॉरिसला वाटत असे. या रागातूनच अभिषेक घोसाळकर यांना संपवण्यासाठी मॉरिसने कट रचला असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

हेही वाचा : ABHISHEK GHOSALKAR : “आज लोग बहोत सरप्राइज होंगे…”; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत काय संवाद झाला

पोलीस बंदोबस्त

दहिसरमध्ये घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस गुरुवारी रात्रीच मॉरिसच्या ऑफिसमध्ये पोहोचले. हे ऑफिस सील करण्यात आलं असून घोसाळकर आणि मॉरिसची लोकप्रियता पाहता या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ते पिस्तुल कोणाचं?

मॉरिसने घोसाळकरांवर ज्या पिस्तुलमधून गोळीबार केला ते त्याच्या मालकीचं नव्हतं. मॉरिसला पोलिसांनी शस्त्र परवानाचा दिलेला नव्हता अशी माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता मॉरिसचा बॉडीगार्ड शर्मा यांच्या नावाने परवाना जारी केलेलं पिस्तुल मॉरिसने वापरल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी शर्माला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -