घरमहाराष्ट्रJarange VS Bhujbal : छगन भुजबळांच्या 'त्या' दाव्यावर जरांगेंनी एकेरी उल्लेख करत...

Jarange VS Bhujbal : छगन भुजबळांच्या ‘त्या’ दाव्यावर जरांगेंनी एकेरी उल्लेख करत म्हटलं…

Subscribe

जालना : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी आज मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभरात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दावा केला की, ओबीसी आयोगातील सदस्यांना काढून टाकण्यात आले आणि त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. यासंदर्भात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी छगन भुजबळ यांचा एकेरी उल्लेख करत संताप व्यक्त केला आहे. (Jarange VS Bhujbal On Chahgan Bhujbal claim Manoj Jarange Patil again mentioned singles)

हेही वाचा – Chhagan Bhujbal : सरकारने आता कुणबीकरण थांबवावे; छगन भुजबळांची थेट मागणी

- Advertisement -

जेव्हापासून मराठा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या ओबीसी आयोगामध्ये एक-एक सदस्यांना काढून टाकण्यात आले किंवा त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, असं त्यांचं खासगीमध्ये सांगणं असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे. यासंदर्भात प्रश्न विचारल्यावर मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांचा एकेही उल्लेख करत म्हटले की, त्यांना कामच काय? खोटं केलं, काय केलं हे सांगण्याशिवाय, पण साडेचार लाख कर्मचारी कशाला खोटं म्हणतील. त्यांनी काम केलं म्हणून अहवाल आला. पण त्यांना (छनग भुजबळ) नाव ठेवायची सवय आहे. एकाद्या नदीला नेहमीच पाणी येत असेल. त्यामुळे शेतकऱ्याला शेताकडे किंवा गावाकडे जायची नेहमीच अडवणूक होत असेल तर त्याच्याकडे पर्यायी रस्ता असला पाहिजे. मग मराठ्यांना मागसवर्ग आयोग, सगेसोयरे आणि कुणबीच्या माध्यमातून आरक्षण मिळालं आहे. त्यामुळे आता पाचही बाजूने मराठ्यांच्या लेकरांचा फायदा होईल, हे त्यांना सहन होत नसेल तर आम्ही काय करू? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – IND VS ENG Test : अश्विनची एक चूक अन् इंग्लंडला बॅटिंग करण्याआधीच मिळाल्या 5 धावा

- Advertisement -

छगन भुजबळ काय म्हणाले?

आज सकाळी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी म्हटले की, आजच शुक्रे समितीने अहवाल मुख्यमंत्र्याना सादर केला. आता अहवाल काय हे मला माहित नाही. त्यामुळे नक्की त्या अहवालामध्ये काय-काय आहे, हे कळायला मार्ग नाही. परंतु मला वाटते आहे की, 15 दिवसांमध्ये 1 कोटी 58 लाख घरांचं सर्वेक्षण केलं आहे. खरं म्हणजे हा विक्रम आहे. जर आणखी 15 दिवस दिले तर महाराष्ट्राची जाती जणना सुद्धा होऊन जाईल. प्रचंड वेग आहे त्यांच्या सर्वेक्षणाचा, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. तसेच जेव्हापासून मराठा आंदोलन सुरू झालं तेव्हापासून या ओबीसी आयोगामध्ये एक-एक सदस्य जे आहेत, त्यांच्यावर दबाव आणण्यात आला, असं त्यांचं खासगीमध्ये सांगणं असल्याचा दावा छगन भुजबळ यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -