घरमहाराष्ट्रनाशिकChhagan Bhujbal : सरकारने आता कुणबीकरण थांबवावे; छगन भुजबळांची थेट मागणी

Chhagan Bhujbal : सरकारने आता कुणबीकरण थांबवावे; छगन भुजबळांची थेट मागणी

Subscribe

नाशिक : मराठा समाज शैक्षणिक आणि सामाजिक परिस्थितीच्या आधारावर मागास असल्याचा अहवाल मागासवर्ग आयोगाने आज (16 फेब्रुवारी) महाराष्ट्र सरकारला सादर केला. या अहवालानुसार मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कुणबी नोंदी असलेल्यांना मराठा आरक्षण मिळणार नसल्याचाही खुलासा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी म्हटले की, सरकारने आता कुणबीकरण थांबवावे. (Govt should stop Kunbikaran now Direct demand for Chhagan Bhujbal)

हेही वाचा – Shivsena: शिवसेनेच्या महाअधिवेशनात संभाजी भिडेंची उपस्थिती; मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने परतले माघारी

- Advertisement -

छगन भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या, त्याला आमचा पाठिंबा आहे. पण त्याच्यापुढे आमचं म्हणणं आहे की, त्यांना ओबीसीतून देऊ नका. कारण अलिकडे अनेक मराठा समाजाच्या लोकांना खोट्या नोंदी घेऊन कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये एका घरात 86 कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. हे सर्व तिथल्या समाजाच्या लोकांना कळंत. आम्ही बाहेर काही म्हणाले तरी, गावात या गोष्टी घडतात त्यावेळेला गावचे लोक विचार करतात, यांना कसं काय कुणबी प्रमाणपत्र मिळालं. त्यामुळे सरकारने आता कुणबीकरण थांबवावं, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, आता जे काही खोटे दाखले दिले असतील त्यांना मराठा समाजाला जे वेगळं आरक्षण देणार आहात त्यात टाका. मुख्यमंत्र्यांनी जरी सांगितलं असेल की, ओबीसीला धक्का लागणार नाही. पण माझी हीच विनंती आहे की, मराठा समाजाला मराठा कुणबी म्हणून जे दाखले दिले आहेत. आताच्या दोन-चार महिन्यामध्ये दिलेले प्रमाणपत्र तपासा, तेवढेच ओबीसी शांत राहतील. कारण उच्च न्यायालयाने मागे मराठा समाजाला 13 टक्के मंजूर केले होते. मग आता तेवढं मोठं आरक्षण त्यांना तिथे आहे, मग ते आमच्या 17 टक्क्य्यांमध्ये आणि 374 जातींमध्ये येऊन काय करणार? म्हणून त्यांना वेगळ्या आरक्षणात सामील करून घ्या. नाहीतर 13 टक्क्यांमध्ये कोणीच राहणार नाही, असेही छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Farmers protest : …तर हे सरकार निवडणुकीआधीच नष्ट होईल, ठाकरे गटाचा इशारा

ओबीसी आरक्षणाला धक्का बसला तर…

छगन भुजबळ म्हणाले की, समितीने दाखल केलेल्या अहवालात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे. आजही महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात मराठा समाज हा प्रथम स्थानावर आहे, मग सामाजिक दृष्ट्या मागास कसा? असा सवाल निर्माण होतो आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला, तर ओबीसी समाजात मोठी अशांतता पसरेल. अशावेळी त्यांना कुठल्याही नेत्याची सुद्धा गरज राहणार नाही. आज लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवल्या जात आहेत, लोकांमध्ये जागृती आहे. हे सर्व राजकारण्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे माझ्या मनातलं भय मी बोलून दाखवत असल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -