घरमहाराष्ट्रJayant Patil : द. नगरमधून ते निवडून येतील, पण...; निलेश लंकेंबाबत जयंत...

Jayant Patil : द. नगरमधून ते निवडून येतील, पण…; निलेश लंकेंबाबत जयंत पाटलांचे मोठे विधान

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार निलेश लंके यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतली. यानंतर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या पक्षात घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली होती. परंतु, तांत्रिक कारणास्तव त्यांचा पक्ष प्रवेश लांबविण्यात आला आहे. तर महत्त्वाची बाब म्हणजे, निलेश लंके यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केला तर त्यांना मविआकडून दक्षिन अहमदनगरच्या लोकसभेची उमेदवारीही देण्यात येऊ शकते. याचबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. (Jayant Patil big statement about Nilesh Lanke)

हेही वाचा… Sanjay Raut : ठाकरे-शहा भेटीवर संजय राऊतांचा टोला, म्हणाले – त्यांच्या मनातल्या संवेदना…

- Advertisement -

पुण्यात आज अजित पवार गटाचे नेते बजरंग सोनावणे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते पुण्यात दाखल झाले आहेत. याचवेळी जयंत पाटील यांना निलेश लंके यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांच्याकडून महत्त्वाचे विधान करण्यात आले आहे. यावेळी ते म्हणाले की, निलेश लंके हे लोकप्रिय नेते आहेत आणि ते जर का उभे राहिले तर ते 100 टक्के निवडून येतील. त्यामुळे ते आमचे उमेदवार असावेत असेही आम्हाला वाटते. त्यासाठीचे आवश्यक ते सोपस्कर योग्यवेळी पूर्ण करण्यात येतील.

तसेच, ज्यावेळी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांना दिलेली तुतारी त्यांनी हातात धरली होती. कारण ती तुतारी मीच लंकेंना दिली होती. पण आता कोणत्याही तांत्रिक अडचणीत ते फसावेत, असे मला वाटत नाही. त्यामुळे तेव्हा त्यांनी ती तुतारी स्वीकारली की नाही, यांवर कोणतेही भाष्य करू इच्छित नाही. पण योग्यवेळी निलेश लंके यांच्याबाबतचा निर्णय कळवण्यात येईल. परंतु, निश्चितच यंदा दक्षिण नगर लोकसभेत तुतारी वाजवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ठामपणे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -