घरमहाराष्ट्रकुणालाही पक्षात घेण्याचे सेना-भाजपचे धोरण हास्यास्पद - जयंत पाटील

कुणालाही पक्षात घेण्याचे सेना-भाजपचे धोरण हास्यास्पद – जयंत पाटील

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसमधून होणाऱ्या आऊटगोईंगबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर मौन सोडले. पुणे जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाच्यावतीने उमेदवारांच्या मुलाखती सुरु आहेत. यावेळी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षांतराबाबत टीका केली. शिवसेना आणि भाजप दिसेल त्याला पक्षात घेत असून हे हास्यास्पद असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमागे ईडी, आयकर विभागाच्या चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. त्यामुळेच आघाडीतील नेते युतीत सामील होत असल्याचा आरोपही पाटील यांनी केला.

हे वाचाभरडं पीठ बाजूला गेलेलं कधीही चांगलच! – रोहित पवार

आज पुणे येथे बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, आज भाजप-सेनेची लाट असल्यामुळे अनेक नेते तिकडे जात आहेत. मात्र त्यांची लाट ओसरल्यानंतर आमच्याकडे पुन्हा एकदा संख्या वाढेल. आमच्या पक्षातील भाकड गायीच शिवसेना-भाजपात जात असल्यामुळे आम्हाला त्याचा काहीही फरक पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सेना-भाजपचेही काही आमदार आमच्या संपर्कात असून आम्ही योग्य वेळी जाहीर करू, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

चित्रा वाघ यांच्याजागी रुपाली चाकणकर

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबद्दल घोषणा केली. चित्रा वाघ यांच्या राजीनाम्यानंतर २४ तास होण्याच्या आतच नवीन महिला प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजुला सचिन अहिर यांनी पक्षांतर करुनही त्यांच्या जागी नव्या मुंबई अध्यक्षाची घोषणा केलेली नसल्यामुळे पक्षात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -