घरमहाराष्ट्रभरडं पीठ बाजूला गेलेलं कधीही चांगलच! - रोहित पवार

भरडं पीठ बाजूला गेलेलं कधीही चांगलच! – रोहित पवार

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या त्यांच्यातून होणाऱ्या आऊटगोईंगसाठी चांगलाच चर्चेत आहे. भाजप किंवा शिवसेनेत प्रवेश करणारी रोज नवीन नावे समोर येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यापैकी अद्याप कुणीही पक्षांतरावर भाष्य केलेले नाही. अशा प्रसंगी तरुण कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी रोहित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. “एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसंही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडं पीठ आपोआप बाजूला गेलेलं कधीही चांगलंच असतं.”, अशी फेसबुक पोस्ट रोहित पवार यांनी लिहीली आहे.

रोहित पवार पुढे म्हणाले की, संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असं लावलं जातं आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आलं नसतं. तसंही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो.”

- Advertisement -

संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे…

Rohit Rajendra Pawar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಜುಲೈ 26, 2019


राष्ट्रवादीतून कुणाचे आऊटगोईंग

शहापूरचे विद्यमान आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मुंबई प्रदेश अध्यक्ष सचिन अहिर यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार वैभव पिचड, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार बबनराव शिंदे इच्छूक असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -