घरदेश-विदेशधोनीला सुरक्षा पोहोचवण्याची गरज नाही; तो समर्थ आहे - लष्कर प्रमुख

धोनीला सुरक्षा पोहोचवण्याची गरज नाही; तो समर्थ आहे – लष्कर प्रमुख

Subscribe

'लष्करात सामील होणारा प्रत्येक व्यक्ती कठीण परिस्थितीशी झुंज देण्यास सक्षम असतो. याशिवाय कठीण परिस्थिताला सोमोरे जाण्याची त्याची तयारी असते. त्यामुळेच ती व्यक्ती लष्करात येते. धोनीने तर नागरिकांचे आणि स्वत:चे प्रशिक्षण करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेतले आहे, असे बिपीन रावत म्हणाले आहेत.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने विंडीज दौऱ्यावर न जाता सैन्य दलात प्रशिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी आता काश्मीरमध्ये गस्त घालणार आहे. धोनी एक सेलेब्रेटी आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसंदर्भात काहींनी प्रश्न उपस्थित केले होते. यावर लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी धोनी स्वत: चे संरक्षण करण्यास समर्थ आहे, असे प्रत्युत्तर दिले आहे. त्याचबरोबर देशवासीयांच्या सेवेसाठी धोनी तत्पर असून तो समर्थ आहे. त्याला दिलेले काम तो जबाबदारीने पार पाडेल, असेही बिपीन रावत म्हणाले आहेत.

नेमके काय म्हणाले बिपीन रावत?

बिपीन रावत म्हणाले की, ‘धोनीला संरक्षण पुरवण्याची खरच काही गरज वाटत नाही. कारण तो स्वत: चे संरक्षण स्वत: करु शकतो. याशिवाय त्याच्यावर देशवासीयांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेली जबाबदारी तो चोखपणे पार पाडेल, असा विश्वास आहे. खरंतर लष्करात सामील होणारा प्रत्येक व्यक्ती कठीण परिस्थितीशी झुंज देण्यास सक्षम असतो. याशिवाय कठीण परिस्थिताला सोमोरे जाण्याची त्याची तयारी असते. त्यामुळेच ती व्यक्ती लष्करात येते. धोनीने तर नागरिकांचे आणि स्वत:चे प्रशिक्षण करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण घेतले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवायची गरज नाही. कारण तो स्वत:च देशाच्या नागरिकांचे संरक्षण करु शकतो.’ त्याचबरोबर धोनी ज्या आर्मी बटालियनचा सदस्य आहे, ती अत्यंत दमदार कामगिरी करणारी आहे, असेही रावत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -