घरमहाराष्ट्रनाशिकदेशसेवेत जायखेड्याच्या सुपुत्राला वीरमरण

देशसेवेत जायखेड्याच्या सुपुत्राला वीरमरण

Subscribe

आसाम येथे कर्तव्यावर असताना जवान सागर अहिरेंचे बलिदान

जायखेडा : नाशिक जिल्ह्यातील जायखेडा (ता. बागलाण) येथील जवान सागर अशोक अहिरे (वय ३२) यांना सेवा कर्तव्यावर असतांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज (मंगळवारी) जायखेडा गावी आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. सागर अहिरे हे ११ वर्षांपूर्वी सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी देशासाठी बलिदान दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर अशोक अहिरे हे आसाम येथे ड्युटीला होते. सागर अहिरे हे सेवा कर्तव्यावर असतानांच वीरमरण आल्याची माहिती त्यांच्या घरी दूरध्वनीवरून सेना दलातील अधिकार्‍यांनी दिली. सागर अहिरे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण घेतले. प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण जायखेडा येथील विद्यालयामध्ये त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर २०११ मध्ये सैन्यदलात त्यांचे सिलेक्शन झाले. सैन्यदलात दाखल होऊन १२ वर्ष पूर्ण झाले होते. सेवेचे काही वर्ष शिल्लक असतानाच देशसेवा बजावताना सागर अहिरे यांना वीरमरण आले. त्यामुळे त्यांच्या अहिरे कुटुंब व जायखेडासह संपूर्ण बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्च्यात आई-वडील, एक भाऊ, भावजाई, पुतण्या असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज (मंगळवारी) जायखेडा येथे आणण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisement -

पाच वर्षांनी होणार होते निवृत्त

सागर अहिरे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर पाच वर्षांनी निवृत्त होऊन घरी परतणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आले.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील जायखेड्याचे भूमिपुत्र जवान सारंग अशोक अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाल्याची बातमी कळली. अतिशय दुःख झाले. शेतकरी कुटुंबातील असलेले शहीद जवान सारंग अहिरे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्यदलात कार्यरत झाले होते. आपल्या भारतमातेच्या सेवेचे कर्तव्य बजावत असताना त्यांना आसाम येथे वीरमरण आले. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो. – छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -