घरमहाराष्ट्रJitendra Awhad : "अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार?" आव्हाडांचा रणजीत सावरकरांवर हल्लाबोल

Jitendra Awhad : “अकलेचे तारे तोडणाऱ्यांवर काय बोलणार?” आव्हाडांचा रणजीत सावरकरांवर हल्लाबोल

Subscribe

मुंबई : गांधीची हत्या गोडसेनी केली नसल्याचा धक्कादायक दावा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. सावरकरांनी ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या नावाचे पुस्तक लिहिले असून या पुस्तकातून हा दावा केला आहे.या पुस्तकाचे नुकतेच नवी दिल्लीत प्रकाशन झाले. त्यामुळे सावरकरांच्या नव्या दाव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. रणजीत सावकर यांनी केलेल्या या दाव्याबाबत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या मुद्द्यावरून रणजीत सावरकरांवर निशाणा साधला. (Jitendra Awhad criticizes Ranjit Savkar claim that Gandhi was not killed by Godse bullet)

हेही वाचा… Ranjeet Savarkar : महात्मा गांधीची हत्या गोडसेच्या गोळीने नाही! रणजीत सावरकरांचा धक्कादायक खुलासा

- Advertisement -

अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी रणजीत सावरकर यांना सुनावले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी महात्मा गांधी यांना नथुराम गोडसेने मारले नाही असे सांगितले जात आहे. मग मारणारी एखादी अदृश्य शक्ती असेल. काही दिवसांनी म्हणतील महात्मा गांधी तिथे नव्हतेच. नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता. त्यामुळे असल्या लेखकांवर न बोललेले बरे. अशांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार?, अशा शब्दांत आव्हाडांनी सावरकरांवर टीका केली.

पुढे ते म्हणाले की, महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसेने केला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. नेहरूंनी काही काम केले नाही, मग काय अदृश्य शक्तीने हे केले का? महात्मा गांधींना मारून इंग्लंडला काय फायदा होणार होता? नेहरू-गांधींना बदनाम करण्याचा कट अनेक वर्ष सुरू आहे. वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचे काम सुरू आहे. जागतिक बाजारात याला मूर्खपणा म्हणतात. महाराष्ट्र सदनात अशा पुस्तक प्रदर्शनाला संमती दिलीच कशी? गोळ्या कोणी झाडल्या हे पाहणारे अनेक साक्षीदार होते. त्यातले एक काकासाहेब गाडगीळ होते, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांना दिली.

- Advertisement -

रणजीत सावरकरांचा दावा काय?

रणजित सावरकर यांनी त्यांच्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकातून दावा केला आहे की, नथुराम गोडसे याने झाडलेल्या गोळ्या आणि महात्मा गांधीजींच्या शरीरात आढळलेल्या गोळ्या वेगवेगळ्या होत्या. नथुराम गोडसे हा गांधी यांना मारायला आला होता हे 100 टक्के खरे आहे. त्यांने गोळ्या मारल्या हेही 100 टक्के खरे आहे. पण नथुराम गोडसे याच्या पिस्तुलातून मारलेल्या गोळीतून गांधींचा खून झाला नाही. कारण गांधींना लागलेल्या गोळीचा आणि नथुरामच्या पिस्तुलातील गोळीचा आकार वेगळा आहे. पण ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा नथुराम गोडसे याचे क्रॉस व्हेरिफिकेशन झाले नाही. त्यामुळे गांधींच्या हत्येचा फायदा नेहरू घराण्याला झाला असा दावा रणजीत सावरकर यांनी पुस्तकातून केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -