घरमहाराष्ट्रपावसाने गोव्याला झोडपले; अतिवृष्टीचा इशारा

पावसाने गोव्याला झोडपले; अतिवृष्टीचा इशारा

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने गोव्यालाही चांगलेच झोडपून काढले असून येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह मुंबईत धुमाकूळ घालणाऱ्या पावसाने गोव्यालाही चांगलेच झोडपून काढले आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तेथील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत जास्तीत जास्त ६ इंच तर काही ठिकाणी अडीच ते ३ इंच पाऊस पडला आहे. तसेच येत्या २४ तासांत गोव्यात अनेक भागांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.


हेही वाचा – पुराचे पाणी शेतकर्‍यांचा डोळ्यात

- Advertisement -

वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

गोव्यात येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गोव्यात अंजुणे धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे. तर मांडवी नदीत भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढल्याने रायबंदरसारख्या ठिकाणी मांडवीचे पाणी महामार्गापर्यंत पोहचले आहे. त्याचप्रमाणे डिचोलीतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने आणि अंजुणे धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर झाल्याने साखळी आणि डिचोली या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मधलावाडा सावईवेरे येथील गोशाळेवर वृक्ष कोसळल्याने छप्पर आणि भिंतीखाली सापडून चार गुरांचा मृत्यू झाला आहे.

पणजीत सर्वाधित पाऊस

यंदा सर्वात जास्त पाऊस पडला आहे. तसेच पणजीत सर्वाधिक पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. गेल्या २४ तासांत पणजीत तब्बल साडेचार इंच पाऊस झाला असून यंदाच्या मोसमात पणजीत सर्वाधिक २ हजार २३० मिमी इतका पाऊस पडला आहे. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पावसाचा सरपटणाऱ्या प्राण्यांनांही फटका; ३३४ सरपटणारे प्राणी रेस्कू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -