घरताज्या घडामोडीकेतकी चितळेला जामीन मिळाला पण सुटका नाही, का ते वाचा?

केतकी चितळेला जामीन मिळाला पण सुटका नाही, का ते वाचा?

Subscribe

केतकी चितळेला जामीन मिळाला असला तरीही तिची तुरुंगातून सुटक होणार नाहीय. न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचकल्यावर तिला जामीन दिला आहे.

अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला अखेर एका प्रकरणात जामीन मिळाला आहे. २०२० साली तिच्याविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिला आता जामीन मिळाला असला तरीही तिची तुरुंगातून सुटका होणार नाहीय. न्यायालयाने २५ हजारांच्या जातमुचकल्यावर तिला जामीन दिला आहे. दरम्यान केतकीने मुंबई उच्च न्यायालयात तिला झालेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल केली. ज्यानंतर आता केंद्रीय महिला आयोगाने देखील तिच्या बाजूने येत पोलीस महासंचालक रजनीस सेठ यांना नोटीस पाठवली आहे. (Ketki Chitale got bail but not released, why read that?)

केतकीला जामीन मिळाला असला तरीही पुढील पाच दिवस ती तुरुंगातच राहणार आहे. कारण, शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी तिच्यावर अजूनही सुनावणी सुरू आहे. याप्रकणावर २१ जून रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत तिला जामीन मिळाला तरच ती तुरुंगाबाहेर येऊ शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – केतकी चितळेला अॅट्रोसिटी प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

अॅट्रोसिटीचं प्रकरण काय?

- Advertisement -

केतकी चितळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत असते. तिने केलेली अनेक वक्तव्ये चर्चेचा विषय ठरतात. अशाचप्रकारे १ मार्च २०२० रोजी तिने एक पोस्ट केली होती. यामध्ये तिने अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. नवबौद्ध लोक ६ डिसेंबरला मुंबई दर्शनाला येतात. अशा पद्धतीची पोस्ट करत तिने वादाला तोंड फोडले होते. दरम्यान, नवबौद्ध या वाक्याचा संदर्भ घेत स्वप्नील जगातप यांनी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तिची सुनावणी सुरू होती. या प्रकरणात सप्टेंबर २०२१ मध्ये ठाणे सत्र न्यायालयाने केतकीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यामुळे तिच्यावर अटकेची टांगती तलवार होती. अखेर नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात केतकीला १४ मे २०२२ रोजी ताब्यात घेतलं.

शरद पवारांवरील टीका भोवली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांच्या आजाराबद्दल विकृत मजकूर असलेली पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे शेअर केली होती. याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केतकीविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात केतकी चितळेला 14 मे रोजी सायंकाळी पोलिसांनी अटक केली होती. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. अटकेनंतर तिला गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -