घरताज्या घडामोडीएमआयएमचं एक मत महाविकास आघाडीला, उद्या मुंबईतील बैठकीनंतर होणार अंतिम निर्णय

एमआयएमचं एक मत महाविकास आघाडीला, उद्या मुंबईतील बैठकीनंतर होणार अंतिम निर्णय

Subscribe

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका येत्या २० जून रोजी पार पडणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून अपक्षांसह छोट्या आमदारांची मनधरणी केली जात आहे. यानिमित्त मुंबईतील राजकारणाने वेगळंच वळण घेतलं आहे. कारण काँग्रेस विरूद्ध भाजपा अशी लढत या निवडणुकीमध्ये आपल्याला पहायला मिळणार आहे. दरम्यान, एमआयएमच्या दोन आमदारांपैकी एका आमदाराचं मत काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांना दिलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एमआयएमच्या दोन आमदार आणि खासदार जलील यांची बैठक औरंगाबाद झाली. या बैठकीत हंडोरेंना एक मत दिलं जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. परंतु अंतिम निर्णय उद्या मुंबईतील बैठकीत घेण्यात येणार आहे.

- Advertisement -

विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजीराव गर्जे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. तर भाजपमधून रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी मागे घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि भाजप यांच्यात आता निवडणुकीत घमासान होताना दिसणार आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी दलित समाजासाठी मोठं केलं असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार, याचा निर्णय एमआयएमने अखेरपर्यंत गुलदस्त्यात ठेवला होता. खुद्द एमआयएमचे प्रमुख नेते असदुद्दीन ओवैसी यांनीही शिवसेनेला प्रस्ताव दिला होता. मात्र, मतदानाच्या अखेरच्या दिवशी सकाळी मात्र आपण महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं एमआयएमने घोषित केलं होतं. तरीदेखील महाविकास आघाडीचे नेते संजय पवार यांचा पराभव झाला. त्यामुळे आता राज्यसभेच्या निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या निवडणुकीतही एमआयएमची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : काँग्रेसकडून मुंबईत जोरदार आंदोलन; पोलीस बंदोबस्तात मोर्चा राजभवनकडे रवाना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -