घरताज्या घडामोडीराऊतांचा २ ट्रक पुरावा गृह विभागाला कचरा वाटला असेल, म्हणूनच दखल नाही......

राऊतांचा २ ट्रक पुरावा गृह विभागाला कचरा वाटला असेल, म्हणूनच दखल नाही… सोमय्यांची राऊतांवर बोचरी टीका

Subscribe

संजय राऊतांनी जुहूच्या प्रॉपर्टीसाठी ईडीच्या अधिकाऱ्याला १५ कोटी रूपये दिल्याचा आरोप किरीट सोमय्यांवर केला होता. या प्रकरणात किरीट सोमय्यांनी खुलासा केला आहे. कोणत्या अधिकाऱ्याला १५ कोटी रूपये दिले ? याचा खुलासा संजय राऊतांनी करावा. त्या अधिकाऱ्याच्या नावे तक्रार मी दाखल करतो, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी खुले आव्हान संजय राऊतांना दिले आहे. किरीट सोमय्यांविरोधात २११ घोटाळे बाहेर काढत २ ट्रक भरून ईडीच्या कार्यालयात जाणार या राऊतांच्या मुद्द्याचाही किरीट सोमय्यांनी समाचार घेतला. या मुद्द्यावर राज्याच्या गृह विभागालाही सोमय्यांनी लक्ष्य केले.

किरीट सोमय्याचे दोन ट्रक भरून पुरावे ईडीला देणार असल्याच्या संजय राऊतांच्या मुद्द्याचाही किरीट सोमय्या यांनी समाचार घेतला. जेव्हा किरीट सोमय्यांचे २११ घोटाळे बाहेर काढण्याची भाषा संजय राऊतांनी केली तेव्हा २ ट्रक भरून पुरावे हे ईडीला सादर करणार असल्याचे म्हटले. मुळात ईडीला अशी थेट तक्रार दाखल करता येत नाही, हे राऊतांनी समजून घ्यावे. त्यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून FIR दाखल करावी लागते. त्यानंतर ईडीला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगण्याचा अधिकार राज्य सरकारकडे आहे. पण राऊतांनी गृह विभागाला दिलेल्या पुराव्यांमध्ये काही दम नाही, म्हणूनच या प्रकरणात एकही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. याचाच अर्थ राज्याचा गृह विभाग हा किरीट सोमय्यांनी अतिशय गांभीर्याने घेत नाही हेच स्पष्ट होते. त्यामुळे २ ट्रक पुरावे नेण्याआधी संजय राऊतांनी प्रक्रिया समजून घ्यावी असाही चिमटा सोमय्यांनी यावेळी काढला. राज्याच्या गृह विभाला राऊतांचे पुरावे कचरा वाटला असेल, म्हणूनच दखल घेतली नसावी अशीही टीका सोमय्यांनी यावेळी केली.

- Advertisement -

संजय राऊतांनी याआधी किरीट सोमय्यांनी ईडीच्या नावावर वसुली करत ७५०० कोटी रूपये हे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना दिल्याचा आरोप केला होता. ईडीच्या अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात पैसे दिल्याचा आरोप त्यांनी केला होता. तसेच किरीट सोमय्यांविरोधात शेकडो तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी घेऊन २ ट्रक पुरावे घेऊन मी दिल्लीला धडकणार असल्याचेही राऊत यांनी म्हटले होते. पण सोमय्यांनी राऊतांना ईडीकडे तक्रार करण्याची पद्धत सांगत त्यांची खिल्ली उडवली. तसेच कोणत्याही प्रकरणात कागद हातात असल्याशिवाय बोललो नाही, असेही स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -