घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री अजित पवार लोकांना फसवणं बंद करा, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार लोकांना फसवणं बंद करा, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

Subscribe

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना फसवणं बंद करावे असे वक्तव्य माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलं आहे. बेनामी संपत्ती जमा केल्या प्रकरणी अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. यामध्ये काही संपत्तींवर जप्ती आणण्याचे आदेशही दिले आहेत. आयकर विभागाने अजित पवारांच्या मुलाच्या संपत्तीवर धाड टाकली होती. आयकर विभागाने १ हजार कोटी रुपयांची बेनामी संपत्ती असल्याचे सांगितले आहे. तसेच अजित पवारांची ८ पेक्षा अधिक शहरांत बेनामी संपत्ती असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी लोकांना मूर्ख बनवणे, फसवणे बंद करावं असे सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच पवारांच्या कुटुंबीयांनी हजारो कोटींहून अधिक बेनामी पद्धतीने संपत्ती उभी केली आहे. ८ पेक्षा अधिक शहरांमध्ये संपत्ती खरेदी केली असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच स्पार्कलिंग सॉईल प्रायव्हेट लिमिटेड या होल्डिंग मेन कंपनी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावे स्थापन केली आहे. यासाठी १३ वर्षांपूर्वी १०० कोटी रुपये मिळाले आहेत. यामुळे अजित पवारांनी लोकांना मुर्ख बनवणे बंद करावे असे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

अजित पवारांच्या ५ ठिकाणांचा उल्लेख

आयकर विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काही मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जवळपास १ हजार कोटी रुपयांच्या बेनामी संपत्तीवर कारवाई करण्यात येत आहे. अजित पवारांना आयकर विभागाने ९० दिवसांचा वेळ दिला असून या वेळात ही संपत्ती बेनामी नसल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. पुण्यातील जरंडेश्वर साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील फ्लॅट, पार्थ पवार यांचे मुंबईतील कार्यालय, गोव्यातील निलय रिसॉर्ट आणि राज्यातील वेगवेगळ्या ८ पेक्षा अधिक शहरांत जमिनींचा यामध्ये समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘हॉटेल द ललित’मध्ये अनेक गुपितं, नवाब मलिकांच्या ट्विटचा उलगडा रविवारी होणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -