घरमहाराष्ट्रअलिबागच्या निटको टाईल्सला टाळे

अलिबागच्या निटको टाईल्सला टाळे

Subscribe

300 कामगारांवर उपसमारीची वेळ

तालुक्यातील श्रीगाव येथील निटको टाईल्स कंपनी प्रशासनाने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता रातोरात टाळे ठोकले आहे. त्यामुळे कंपनीत काम करणारे 300 कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष बाब म्हणजे जे पाच कामगार रात्रपाळीसाठी कामावर होते त्यांनासुद्धा याची कल्पना नसून ते कंपनीमध्येच आहेत. कामगार आता न्यायालयात दाद मागणार आहेत. कामगारांनी सोमवारी कंपनीच्या गेटसमोर धरणे आंदोलन केले.

निटको कंपनीचे मालक विवेक तलवार यांनी 1995 साली तालुक्यातील श्रीगाव येथे स्थानिकांची 86 एकर जागा खरेदी केली आहे. या जागेवर 1997 साली निटको कंपनीची बांधणी केली. कंपनी स्थापन झाल्यानंतर स्थानिकांनाही रोजगार मिळाला. स्थानिकांसह कंपनीत 250 कंपनी कामगार, तर 50 कंत्राटी कामगार काम करू लागले. सोमवारी कामगार कंपनीत येऊ लागले तेव्हा कंपनी प्रशासनाने लॉकआऊटची नोटीस लावलेली पाहून सर्व कामगार अचंबित झाले. कंपनीला टाळे ठोकून व्यवस्थापनाने येथील कामगारांना वार्‍यावर सोडले असताना गुजरातमधील युनिट मात्र सुरू ठेवले आहे.

- Advertisement -

कंपनी बंद झाल्याची माहिती कळताच कामगारांनी कंपनीच्या गेटवर येऊन धरणे धरले. कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता कंपनीच्या गेटला लॉक लावले आहे. कंपनी प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. कामगार आयुक्तांकडे आठवड्यापूर्वी बैठक होऊन तोडगा काढण्याबाबत कंपनी प्रशासनाला सांगितले होते. मात्र व्यवस्थापनाने कामगारांना अंधारात ठेऊन कंपनीला टाळे ठोकले आहे, असे कामगारांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -