घरताज्या घडामोडी"शरद पवारांना जाणता राजाच म्हणणार"; छगन भुजबळांनी वक्त केली ठाम भूमिका

“शरद पवारांना जाणता राजाच म्हणणार”; छगन भुजबळांनी वक्त केली ठाम भूमिका

Subscribe

नाशिक : शरद पवार यांना दिलेली जाणता राजा हि उपाधी मला मान्य असून अनेक वर्षांपासून त्यांच्यासोबत फिरतो आहे. शरद पवार यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात लक्ष दिलं आहे. जो जनतेचे प्रश्न सोडवतो, त्याला जाणता राजा म्हणायला काय अडचण आहे? आम्ही म्हणतो, तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यामागील कारण सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून चागंलेच रान पेटले आहे. छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणायचं कि स्वराज्यरक्षक म्हणायचं या प्रश्नावरूनच एकमेकांमध्ये चिखलफेक सुरु आहे. तर दुसरीकडे शरद पवारांना लोक जाणता राजा म्हणतात, यावर भाजपाकडून आक्षेप घेतला जातो, या प्रश्नावर आता माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी बोलतांना सांगितले, शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात काय चूक आहे. आम्हाला म्हणायचा म्हणू. तुम्ही म्हणू नका. शेवटी इतिहासात लिहिले जाईल, कोणी धर्माच्या नावाने पताका फडकावल्या. कोणी सर्वांना बरोबर घेऊन विकास साधला. राज्यकर्त्याला पूर्वीच्या भाषेत राजाच म्हणायचे.

- Advertisement -

 शरद पवार हे राजकारणातून चार वेळा मुख्यमंत्री झाले. देशभरात इतर पदेही भूषविली. त्यांनी गोरगरिबांचे प्रश्न सोडवले. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवले. पुणे, नाशिक, मुंबईमध्ये 80 टक्के ऑटोमाबाइल्सचे कारखाने शरद पवार यांनी आणले. उद्योगधंदा वाढवला. शिक्षणाच्या बाबतीमध्ये काम केले. मी त्याला साक्ष आहे. जेव्हा 1995 च्या काळात सरकार गेले तेव्हा मी शरद पवार यांच्याबरोबर फिरत होतो. उसाच्या मोळ्या टाकायला वेगवेगळ्या कारखान्यात गेलेलो. त्यावेळी ते सांगत होते, एकच काम करायचे. सगळ्या या झोपडपट्टीतल्या आपल्या गोरगरीब मुलांच्या झोपड्यांमध्ये हा कम्प्युटर खेळण्यासारखा गेला पाहिजे, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितली. शिक्षणाच्या बाबतीत त्यांनी काम केले. सामाजिक प्रश्नात किती मोठे काम केले. मंडळ आयोग, महिलांना आरक्षण दिले. सरकार गेले तरी बेहत्तर असा निर्धार करत त्यांनी बाबासाहेब आंबडेकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेतला. यालाच जाणता राजा म्हणतात असे सांगत त्यांनी कामांची यादीच वाचून दाखवली.

काय म्हणाले भुजबळ
  • देशात सगळीकडे महाराष्ट्र भवन करा काही हरकत नाही.
  • मुंबई हे उद्योगपतींचे हब
  • ज्याला जे न्यायचं ते न्यावे.
  • मुख्यमंत्र्यांनी कामाचा झपाटा कमी होऊ देऊ नये.
  • काशी, रामेश्वर, अष्टविनायक सगळीकडे जा, आर्शिवाद घेऊन या.
  • उध्दव ठाकरे पक्षाला बळ देण्याचे काम करताहेत.
  • ठाकरेंच्या दौर्‍यामुळे मविआला बळकटीच मिळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -