घरमुंबईवरवरा राव यांना उपचारासाठी जायचंय हैदराबादला; न्यायालयाकडे मागितली परवानगी

वरवरा राव यांना उपचारासाठी जायचंय हैदराबादला; न्यायालयाकडे मागितली परवानगी

Subscribe

न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) याचे प्रत्त्यूत्तर सादर करण्याचे आदेश दिले. 

मुंबईः कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी तेलगू कवी वरवरा राव यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करायचे आहे. हे ऑपरेशन त्यांना हैदराबादला करायचे आहे. हैदराबादला जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका राव यांनी उच्च न्यायालयात केली आहे.

न्या. आर. जी. अवचट यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला(एनआयए) याचे प्रत्त्यूत्तर सादर करण्याचे आदेश दिले.

- Advertisement -

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी एनआयएने २०१८ मध्ये राव यांना अटक केली. ते न्यायालयीन कोठडीत होते. मार्च २०२१ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राव यांना उपचारासाठी सहा महिन्यांचा जामीन मंजूर केला. त्यानंतर ऑागस्ट २०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राव यांना उपचारासाठी जामीन मंजूर केला. हा जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने राव यांना काही अटी घातल्या. त्यात न्यायालयाने राव यांना मुंबई सोडून न जाण्याचीही अट घातली.

मात्र डॉक्टरांनी राव यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार राव यांनी मुंबईच्या विशेष न्यायालयात अर्ज केला. मुंबईतील रुग्णालयात मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचा खर्च परवडणारा नाही. मला तेलंगणा सरकारची पेंन्शन मिळते. तेथील सरकारी रुग्णालयात मला मोफत उपचार मिळतात. त्यामुळे मला तीन महिने हैदराबाद येथे ऑपरेशनसाठी राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी राव यांनी विशेष सत्र न्यायालयात केली होती. राव यांची मागणी विशेष सत्र न्यायालयाने फेटाळून लावली.

- Advertisement -

त्याविरोधात राव यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यासाठी मला हैदराबादला जाण्यास परवानगी द्यावी. मला ही परवानगी दिल्यास त्याचा मी गैरवापर करणार नाही. मला उपचारासाठी याआधीच जामीन मिळाला आहे. ६ मार्च २०२१ पासून मी जामीनावर आहे. त्यामुळे माझी मागणी मान्य करावी, अशी मागणी राव यांनी याचिकेत केली आहे.

शौर्य दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारीला आंबेडकरी अनुयायी पुण्यातील कोरोगाव- भीमा येथे जातात. येथील विजयीस्तंभाला अभिवादन करतात. २०१८ मध्ये या दिवशी येथे हिंसाचार झाला होता. याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. एनआयएने डाव्या सरणीच्या विचारवंतांना या घटनेप्रकरणी अटक केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -