घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रMaharashtra Politics : एकनाथ खडसेंना सर्व पक्ष घरातच हवे, गिरीश महाजनांचा टोला

Maharashtra Politics : एकनाथ खडसेंना सर्व पक्ष घरातच हवे, गिरीश महाजनांचा टोला

Subscribe

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहूनच आमदार एकनाथ खडसे भाजपाच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे याच मुद्द्यावरून भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे.

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे हे लवकरच भाजपात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. पण त्यांच्या या घरवापसीची तारीख ठरलेली नाही. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहूनच ते भाजपाच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे याच मुद्द्यावरून भाजपा नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग भाजपाचे काम करावे, असा सल्ला महाजनांकडून देण्यात आला आहे. (Maharashtra Politics Girish Mahajan criticizes Eknath Khadse)

शिर्डी दौऱ्यावर असलेल्या गिरीश महाजनांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. खडसे यांनी आगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा. मग भाजपचे काम करावे. राजीनामा न देता भाजपचे काम करत असल्याने लोकांमध्ये गैरसमज होत आहे. एकनाथ खडसे कधी म्हणतात मी राष्ट्रवादीचा, तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे, असा टोला महाजनांनी लगावला.

- Advertisement -

हेही वाचा… Politics : फडणवीसांची भेट अन् निंबाळकरांना पाठिंबा जाहीर करताच कारखान्याचं सील निघालं!

तर, खडसेंची मुलगी (रोहिनी खडसे) विधानसभेला तुतारी घेऊन उभे राहण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे खडसे यांची भूमिका संधीसाधूपणाची आहे. त्यांना सगळे पक्ष घरातच ठेवायचे आहेत. यांनी आमदारकी आणि खासदारकीसाठी सगळ्यांचे काम करायचे. लोकांना असे राजकारण आवडत नाही, त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे खडेबोलच भाजपा नेते गिरीश महाजन यांनी सुनावले आहेत. मागील महिन्यापासून एकनाथ खडसे यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे. त्यामुळे त्यांना दिल्लीतून पक्षप्रवेशाची तारीख कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तर, त्यांचा पक्ष प्रवेश कोणामुळे आणि कोणत्या कारणामुळे रखडला आहे, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

शिर्डी दौऱ्यात प्रसार माध्यमांसमोर बोलताना भाजपा नेते गिरीश महाजन यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही टीका केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लखवा मारलाय असे शरद पवार म्हणाले होते. आज त्याच पवारांसोबत पृथ्वीराजबाबा फिरत आहेत. आपण मुख्यमंत्री असताना काय केले हे आधी बघा. मोदी जगमान्य नेते आहेत. चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून ही अपेक्षा नाही, असे टीकास्त्र त्यांनी डागले आहे.

हेही वाचा… Maharashtra Politics : संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; 20 वर्षांनंतर घरवापसी


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -