घरमहाराष्ट्रकोकणवासी 1 सप्टेंबरपासून घेणार चिपी विमानतळावरून टेकऑफ; पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

कोकणवासी 1 सप्टेंबरपासून घेणार चिपी विमानतळावरून टेकऑफ; पालकमंत्री रवींद्र चव्हाणांची माहिती

Subscribe

चिपी विमानतळ कार्यरत झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरू झाली होती. परंतु कालांतराने ही विमानसेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासीयांचे तसेच मुंबईकरांचे खूप हाल होत होते.

मुंबई : पुढील महिन्यात साजरा होणारा गणेशोत्सव लक्षात घेऊन सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरून येत्या 1 सप्टेंबरपासून नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सुरू करण्यात येईल. दर आठवड्याला ही विमानसेवा सुरू असेल. एअर अलांयन्स (Air Alliance) आणि इंडीगो (Indigo) या दोन विमान कंपन्यांच्यामार्फत ही विमान सेवा प्रवाशांना मिळेल, असे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.(Konkani will take off from Chippy airport from September 1; Guardian Minister Ravindra Chavan’s information)

चिपी विमानतळ कार्यरत झाल्यानंतर मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरू झाली होती. परंतु कालांतराने ही विमानसेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासीयांचे तसेच मुंबईकरांचे खूप हाल होत होते. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी आज नवी दिल्लीत ज्योतिरादित्य शिंदे याची भेट घेऊन चिपी विमानतळावरील प्रवासी विमान सेवेच्या संदर्भात चर्चा केली. या बैठकीमध्ये चव्हाण यांनी विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात शिंदे यांना सविस्तर माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईत पुढील वर्षी आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन; गिरीश महाजनांची माहिती

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केली विनंती

येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरळीत सुरु करण्याची विनंती चव्हाण यांनी यावेळी केली. त्यानुसार येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सकारात्मकरित्या सुरु करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : Cyber Crime रोखण्यासाठी सरसावले नवी मुंबई पोलीस; शॉर्ट फिल्ममधून करणार जनजागृती

आवश्यक त्या पूर्तता चार दिवसांत

चिपी विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत करण्याच्यादृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याच्यादृष्टीने योग्य मार्गदर्शन केल्याचे चव्हाण म्हणाले. आयआरबीने विमान प्राधिकरणाकडून करावयाच्या ज्या आवश्यक पूर्तता येत्या चार दिवसांत पूर्ण करुन देणार असल्याची अशी ग्वाही आयआरबीच्यावतीने वीरेंद्र म्हैसकर यांचे प्रतिनिधी आणि एअरपोर्ट संचालक किरण कुमार यांनी दिली.

कोकणवासीयांना बाप्पा पावला

गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने आणि रवींद्र चव्हाण यांच्या साततच्या पाठपुरव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने कोकणवासियांना गणपती बाप्पा पावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -