घरक्राइमचोरीचा मामला : ज्या चोराला पकडायचं त्याच्यासोबतच सापडली महिला पोलीस; विचित्र प्रकारामुळे...

चोरीचा मामला : ज्या चोराला पकडायचं त्याच्यासोबतच सापडली महिला पोलीस; विचित्र प्रकारामुळे खळबळ

Subscribe

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोराला पडकण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत आढळल्या. या विचित्र प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा पोलीस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्याला एका मोबाईल चोराला पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. पण या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चोराला पडकण्यास टाळाटाळ करत थेट सुट्टीवर गेल्या. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी टाकलेल्या एका धाडीत या अधिकारी चक्क मोबाईल चोरासोबत आढळल्या. या विचित्र प्रकारामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. आरोपी मोबाईल चोराचं नाव सबिर शेर अली सय्यद असं आहे, तर आरोपी महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव कृपाल बोरसे आहे. (Crime news Mumbra Police woman Krupal Borase found with the thief she have to catch Mumbai Police Kherwadi pup)

सुट्टीवर जात असल्याचं सांगत टाळली अटक

झालं असं की, एका तक्रारीनंतर वांद्रे पूर्वमधील खेरवाडी पोलिसांनी या आरोपीचा शोध घ्यायला सुरूवात केली. यात त्यांना हा संशयित आरोपी मुंब्रामधील असल्याचं लक्षात आलं. त्यानं असेच काही गुन्हे विलेपार्ले भागातही केले होते. यानंतर खेरवाडी पोलिसांनी मुंब्रा पोलिसांशी संपर्क केला आणि या आरोपीला पकडण्यास मदत मागितली परंतू, त्यावेळी मुंब्रा स्थानकातील महिला अधिकाऱ्याने आपण काही दिवस सुट्टीवर जात असल्याचं म्हणत काही दिवस थांबवण्यास सांगितलं आणि त्या चोराला अटक करणं टाळलं.

- Advertisement -

चोर आणि पोलीस महिलेत अनेक कॉल्स

खेरवाडी पोलिसांनी मोबाईल चोर सबिर सय्यदची ओळख पटवण्यात यश आलं. पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबरही मिळाला. या नंबरवरही कॉल रेकॉर्ड तपासले असता खेरवाडी पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. आरोपी सय्यद आणि महिला पोलीस अधिकारी यांच्यात काही महिन्यांमध्ये अनेकदा कॉलवर बोलणं झाल्याचं उघड झालं. 7 ऑगस्टला खेरवाडी पोलिसांना आरोपी नवी मुंबईहून मुंबईला येत असल्याचं समजलं. मात्र, आरे येथे आल्यावर त्याचा मोबाईल बंद झाला. त्यामुळे पोलीसांनी संशयित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या फोनचा माग काढला. यात ही महिलाही त्याच परिसरात असल्याचं समजलं. त्यावेळी हे दोघंही पवईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालं. दोघंही एकत्रच असल्यानं, घडलेल्या या विचित्र प्रकारामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

( हेही वाचा: मृत्यूपूर्व जबानी विरोधात असली तरी सर्वोच्च न्यायालयाने दोषीला केले मुक्त, काय आहे प्रकरण? )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -