घरदेश-विदेश"केंद्र सरकार नामर्दासारखे वागते; सत्ता टिकावी म्हणून...", बच्चू कडू यांची टीका

“केंद्र सरकार नामर्दासारखे वागते; सत्ता टिकावी म्हणून…”, बच्चू कडू यांची टीका

Subscribe

पुणे : “केंद्र नामर्दासारखे वागते कधी कधी…ही नामर्दानी आहे. फक्त सत्ता ठिकावी म्हणून ग्राहकाचा विचार केला”, अशा शब्दात विधान माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी टीका केली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवाल दिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आंदोलन करत आहे आणि केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आज आंदोलन केले आहे.

कांदा प्रश्नावर बच्चू कडू पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “शेतकऱ्यांना 200 रुपये प्रतिक्विंटल तुम्ही पैसे द्याचे आणि शेतकऱ्यांचे 100 क्विंटलमागे नुकसान करायचे. लोकांनी कांदा नाही, खाल्ला तर मरणार आहेत का? कांदा न खाल्ल्याने कोणी मेले का? एक तरी उदाहरण आहे का? मीडियासाठी जबाबदार आहे, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले. पुढे बच्चू कडू म्हणाले, “कांद्याचे भाव वाढले तर दाखविता. पण कांद्याचे भाव पडल्यावर तुम्ही दाखवित नाही. तुम्ही ही तेवढेच जबाबदार आहात. केंद्र सरकारने निर्यात शुल्क लावण्याची गरज नव्हती. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरची सोय सरकार आज करते. ऐवढी नालायकी. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्याने पडले. तुम्ही ऐवढे भीता का? मेक इन इडियांचे धोरण अवलंबत असताना निर्यातीवर कर वाढविता. शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेशात सफरचंदाचा भाव येईल ना आणि कांदा नाही खाल्ला तर कोणी मरत नाही, ऐवढी काळजी करायची गरज नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – “केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे…”, सुप्रिया सुळेंचा कांदा प्रश्नावरून हल्लाबोल

केंद्र सरकार नामर्दासारखे वागते

“केंद्र नामर्दासारखे वागते कधी कधी…ही नामर्दानी आहे. फक्त सत्ता ठिकावी म्हणून ग्राहकाचा विचार केला. खाण्याचा विचार केला. पिकवणाऱ्याचा विचार का? केले नाही. ही नालायक प्रवृत्ती सरकारने सुधरली पाहिजे. मी जरी सत्ते असेल, शेतकऱ्यांच्या बाजून हे वक्तव्य मला करावेच लागेल. हे माझे कर्तव्य आहे. भाव वाढले म्हणून हस्तक्षेप करता. भाव कमी झाल्यावर हस्तक्षेप का करत नाही?”, असा उलट सवाल बच्चू कडूने सरकारला केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नाफेडने 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक; मुख्यमंत्र्यांनी मानले पंतप्रधानांचे आभार

दादा भुसेंच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

कांदा परवडेत नसेल, तर खाऊ नका, असे वादग्रस्त विधान माजी कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. दादा भुसेंच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले, “कांदाच्या ताकतीचा माझ्याकडे लसूण आहे. जर तुमच्या खाण्यावर जिवावर येत असेल, तर मुळापण आहे. काय गरज आहे, केंद्र सरकार ही कधी कधी नामर्दासारखे वागते. ही नामर्दांगी आहे. फक्त सत्ता टिकावी म्हणून ग्राहकाचा विचार केला. खाण्याचा विचार केला मग पिकवणाऱ्याचा देखील विचार का करत नाही?”, असा सवाल बच्चू कडूंनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -