घरमहाराष्ट्रलाखो भाविक विठ्ठलाच्या पंढरीत दाखल

लाखो भाविक विठ्ठलाच्या पंढरीत दाखल

Subscribe

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक आज पंढरपुरात दाखल झाले असून अवघी पंढरी विठ्ठलाच्या नाम घोषणेच्या गजराने दुमदुमली आहे.

महाराष्ट्राची भूमी ही साधुसंतांची भूमी! संतकृपा झाली! इमारत फळा आली!
ज्ञानदेवे रचिला पाया! उभारिले देवालया!
नामा तयाचा किंकर! तेणे केला हा विस्तार!
जनार्दन एकनाथ! ध्वज उभारिला भागवत!
भजन करा सावकाश! तुका झालासे कळस!

या छोट्याशा अभंगात महाराष्ट्राची संत परंपरा आणि त्याच्या कार्याची महती सहज समजते. तसेच वारंकरी पंथाचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपुरचे विठ्ठल. या विठ्ठलाच्या पंढरीत आषाढी एकादशीनिमित्त लाखो भक्त दाखल झाले असून सकाळपासून श्री विठ्ठल – रुख्मिणीच्या दर्शनाला भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. सर्वत्र हरिनामाचा गजर सुरु आहे. संतांच्या पालख्या वाखरीतून सायंकाळी येथे दाखल झाल्यानंतर शहरात गर्दी आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. पंढरपूरातील सर्व मठ, हॉटेल, धर्मशाळा, हॉल आणि मंदिर परिसरातील घरे देखील हाऊसफुल्ल झाली आहेत. तर मोकळ्या जागांवर सर्वत्र वारकऱ्यांच्या राहुट्या आणि तंबू दिसून येत आहेत.

- Advertisement -

चंद्रभागेवर भाविकांची मोठी गर्दी

चंद्रभागा येथे भाविकांची मोठी गर्दी असून स्नानासाठी झुंबड उडत आहे. तसेच भक्त पुंडलिकांच्या दर्शनासाठी ही रांगा लागत आहेत. नदीच्या पैलतिरावर साकारण्यात आलेले ६५ एकरातील सर्व प्लॉट आता दिंड्यांना देण्यात आले असून किमान दीड लाख भाविक उतरले असावेत, असा अंदाज आहे. तीन रस्त्यापर्यंत या भागात व्यापार्‍यांनी दुकाने थाटली असून शहरात ही मोठ्या प्रमाणात परगावचे व्यापारी व्यवसायासाठी आले आहेत. जागा मिळेल तेथे त्यांनी आपली दुकाने थाटल्याचे दिसत आहे.

१०० संतांच्या पालख्या विठुरायाच्या नगरीत दाखल

महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो वैष्णवांना घेवून आषाढी वारीस माहेरच्या ओढीने पंढरीस निघालेल्या संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत निवृत्तिनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत एकनाथ यांच्यासह सुमारे १०० संतांच्या पालख्या शेवटचा विसावा घेवून रात्री उशिरा पंढरीत दाखल झाल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – यातायाती धर्म नाही विष्णुदासा; पंढरपूरला मुस्लिम वारकऱ्यांचाही सहभाग

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांना पुढच्या वर्षीही पुजेचा मान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -