घरमहाराष्ट्रLive In Partners: बाळाला खऱ्या पित्याचं नाव मिळावं म्हणून आईची हायकोर्टात धाव

Live In Partners: बाळाला खऱ्या पित्याचं नाव मिळावं म्हणून आईची हायकोर्टात धाव

Subscribe

बाळाच्या जन्माच्या वेळी त्या महिलेचा पती तिच्यासोबत होता परंतु ते बाळ तिच्या Live In Partnerचं आहे. परंतु पालिकेने बाळाचा पिता तिच्या पतीला समजून त्याचं नाव त्या बाळाला दिलं आणि म्हणूनच त्याऐवजी Live In Partner चं नाव पित्याच्या नावाच्या जागी असावं, यासाठी या आईने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आपल्या बाळाला खऱ्या पित्याचं नाव मिळावं म्हणून बाळाच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बाळाच्या जन्माच्या वेळी त्या महिलेचा पती तिच्यासोबत होता परंतु ते बाळ तिच्या Live In Partnerचं आहे. परंतु पालिकेने बाळाचा पिता तिच्या पतीला समजून त्याचं नाव त्या बाळाला दिलं आणि म्हणूनच त्याऐवजी Live In Partner चं नाव पित्याच्या नावाच्या जागी असावं, यासाठी या आईने आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ( Live In Partners Mother s move to High Court to get babys real fathers name due to BMC mistaken  )

नेमकं घडलं काय?

न्यायालयात याचिका करणाऱ्या या महिलेचा विवाह साल 2017 मध्ये झाला होता. त्यानंतर वर्षभरातच हे दोघे वेगळे झाले. घटस्फोटासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता त्यानंतर ते वेगवेगळे राहत होते. त्यावेळी ती महिला दुसऱ्या पुरूषासोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती आणि त्यातच ती गरोदर राहिली. प्रसुतीच्या वेळी मात्र तिचा पती तिच्यासोबत होता. त्यानेच तिला रुग्णालयात दाखल केलं आणि बाळाचा बाप हाच समजून पालिकेने जन्मदाखल्यावर तिच्या पतीचं नाव टाकलं.

- Advertisement -

मात्र, आपल्या बाळाचा पिता हा वेगळा आहे. त्यामुळे त्याचं नाव जन्म दाखल्यावर टाकावं,अशी विनंती तिने मुंबई पालिकेकडे केली होती. मात्र, एकदा नाव नमूद झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही, त्याचा अधिकार आम्हाला नाही, असं पालिकेनं सांगितलं.

त्यामुळे पालिकेच्या विरोधात त्या महिलेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्जही केला होता. मात्र, याप्रकरणात जन्म, मृत्यू नोंदणी कायदा लागू होत नाही, असं दंडाधिकारी न्यायालयानं स्पष्ट करत तिला दिलासा देण्यास नकार दिला.

- Advertisement -

त्यानंतर मात्र, महिलेने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या या प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

एकल पालक किंवा अविवाहित महिलेनें जर बाळाच्या जन्म दाखल्यासाठी अर्ज केला तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रावर संबंधित माहिती घ्यावी व जन्म दाखला द्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. तर मुंबई उच्च न्यायालयानंही एका प्रकरणात पित्याचं नाव जन्म दाखल्यावरून काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत.

( हेही वाचा: “आई-वडिलांचा सांभाळ केला तरच मिळणार योजनांचा लाभ”, नाशिकच्या ‘या’ गावाचा ठराव )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -