घरक्राइमबंदुकीच्या धाकावर अपहरण? आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह 15 जणांविरोधात गुन्हा

बंदुकीच्या धाकावर अपहरण? आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासह 15 जणांविरोधात गुन्हा

Subscribe

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाच्या अपहरणाप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे अडचणीत येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकाच्या अपहरणाप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील गोरेगाव येथील ग्लोबल म्युझिक जंक्शन या कंपनीच्या कार्यालयात बुधवारी हा सगळा धक्कादायक प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. बुधवारी दुपारी 10 ते 15 जणांनी ग्लोबल म्युझिक जंक्शनच्या कार्यालयात येऊन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजकुमार सिंह यांना मारहाण करून अपहरण केल्याचं समोर आलं होतं. हा सगळा प्रकार समोर येताच पोलिसांनी राजकुमार सिंह यांची सुटका केली आहे. मात्र याप्रकरणी पीडित राजकुमार सिंह यांच्यावतीने वनराई पोलीस ठाण्यात स्थानिक आमदार पुत्र राज सुर्वे यांच्यासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Mumbai Maharashtra crime case has been registered against the MLA Prakash Surve son for Kidnapping a businessman at gunpoint )

( हेही वाचा: परदेशातून आला 4 कोटींची लॉटरी लागल्याचा कॉल, 80 वर्षीय वृद्धा फसली अन्.. )

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

राजकुमार सिंह यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आपण मनोज मिश्रा याच्याबरोबर वर्षाचा करारनामा केला होता. मात्र मनोज मिश्राने पैसे परत न करता हा करारनामा जबरदरस्तीने रद्द करण्याकरता शिवीगाळ आणि मारहाण केली. नंतर आपल्याला कार्यालयातून खेचून कारमध्ये बसवून प्रकाश सुर्वे यांच्या मुंबईतील दहिसर पूर्व इथल्या युनिवर्सल हायस्कूल जवळील या कार्यालयात आणलं. यानंतर आपल्याकडून जबरदस्तीनं 100 रुपयांच्या स्ट‌ॅम्प पेपरवर मनोज मिश्रा याच्यासोबत केलेला करारनामा रद्द झाला, असं लिहून घेतलं.

प्रकरण साडे आठ कोटींचं

यानंतर पोलिसांनी या व्यावसायिकाची अपहरणकर्त्यांकडून सुटका केली. पीडित राजकुमारचे वकील सदानंद शेट्टी यांनी माहिती दिली की, हे संपूर्ण प्रकरण साडेआठ कोटी रुपयांचं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -