घरदेश-विदेशLive Update : 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा...

Live Update : 18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी

Subscribe

दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर

18 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस यांचा शपथविधी


कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची पदाधिकाऱ्यांसह बैठक

- Advertisement -

जेठमलानी आणि मनिंदर सिंह उद्या करणार युक्तीवाद, सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली


लंच ब्रेकनंतर सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षाच्या सुनावणीला पुन्हा सुरुवात

- Advertisement -

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद सुरु

अध्यक्षांचे अधिकार आणि इतर बाबींवर युक्तिवाद सुरु

नबाम रेबिया प्रकरणातील प्रक्रिया फक्त विचारात घेण्याची शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांची न्यायालयाला विनंती


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

१७ आणि १८ तारखेला नागपूरमध्ये करणार दौरा

नागपूरमधील दीक्षाभूमी आणि डॉ. हेगडेवार स्मृती स्थळाला देणार भेट

१८ तारखेला होणार पुण्याला रवाना


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर कोर्टात सुनावणी सुरु

शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांचा युक्तिवाद सुरु

हरीश साळवे यांचा उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून युक्तिवाद

उद्धव ठाकरे यांना ३० जूनपर्यंत बहुमत सिद्ध करण्याची वेळ होती : हरीश साळवे

१६ आमदारांमुळे सरकार पडलेले नाही : हरीश साळवे

एकनाथ शिंदे कायदेशीर मुख्यमंत्री : हरीश साळवे

उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे गेले असते तर काही प्रश्न उपस्थित करता आले असते : हरीश साळवे

शिंदे गटाचे गटनेते खासदार राहुल शेवाळे सुप्रीम कोर्टात उपस्थित

आमदारांच्या अधिकारांबाबत भाष्य कारण कठीण, कारण त्याचे परिणाम गंभीर : सरन्यायाधीश

पक्षांतरणाचा निर्णय सदनात होऊ नये : ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल

आमदार-खासदारांमधील फूट म्हणजे पक्षामधील फूट नव्हे : कपिल सिब्बल

शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरु

आम्हीच खरी शिवसेना, आमच्याकडे बहुमत, शिंदे गटाच्या वकिलांचा दावा

शिवसेनेतील बहुसंख्य आमदारांची उद्धव ठाकरेंवर नाराजी : नीरज कौल

हा घटनाक्रम म्हणजे लोकशाहीची हत्या, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला : नीरज कौल

नबाम रेबिया प्रकरणावर युक्तिवाद करा : सरन्यायाधीश

रेबिया प्रकरण बाजूला ठेऊन या प्रकरणाकडे पाहूया : सरन्यायाधीश चंद्रचूड


बीबीसीवरील आयकर छाप्यांमुळे विरोधक आक्रमक


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुरू होणार सुनावणी

ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई आणि अनिल परब सुप्रीम कोर्टात दाखल


पुण्यातील कसब्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बैठक सुरू


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस

मंगळवारी झालेल्या चार तासांच्या युक्तिवादानंतर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

मंगळवारी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी यांनी केला चार तासांपेक्षा जास्त युक्तिवाद


मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांची आज कल्याण आणि उल्हासनगरमध्ये सभा

पहिली सभा कल्याणमध्ये तर दुसरी सभा होणार उल्हासनगरमध्ये


प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची आज टिळक भवनमध्ये होणार बैठक

दुपारी दोन वाजता पार पडणार बैठक

विधान परिषद निवडणुकीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात पहिल्यांदाच येणार समोरासमोर

राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार बैठक


राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पक्षातील सर्व आमदारांची आज सकाळी 10 वाजता विधान भवनात होणार बैठक

बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राहणार उपस्थित


आमदार बच्चू कडूंविरोधातील खटल्याची मुंबई सत्र न्यायालयात होणार सुनावणी

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात आमदार बच्चू कडूंविरोधात दाखल खटल्याची आज मुंबई सत्र न्यायालयात करण्यात येणार सुनावणी


पीएफआय वरील बंदीसंदर्भात आजपासून लवादापुढे सुरू होणार सुनावणी

मुंबई उच्च न्यायालयात निवृत्त न्यायमूर्ती दिनेश शर्मा यांच्यापुढे चालणार सुनावणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -