घरताज्या घडामोडीLok Sabha Election 2024 : काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसारखा वापर केला; देवेंद्र...

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसारखा वापर केला; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

Subscribe

काँग्रेसचा जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे. काँग्रेसने कर्नाटकात दिलेले आश्वासन अजून पूर्ण केलेले नाही. आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

नागपूर : काँग्रेसचा जाहीरनामा फेल आहे. ते कधीच आश्वासन पूर्ण करत नाही. काँग्रेससाठी जाहीरनामा कागद आहे. काँग्रेसने कर्नाटकात दिलेले आश्वासन अजून पूर्ण केलेले नाही. आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. तसेच, काँग्रेसला ओबीसीवर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसारखा वापर केला, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Lok Sabha Election 2024 DCM Devendra Fadnavis Slams Congress Leader Rahul Gandhi)

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रविवारी संकल्पपत्र (जाहिरनामा) सादर केला. या संकल्प पत्रातील माहिती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात पत्रकार परिषद झाली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संकल्पपत्रातील पंचसूत्रीबाबत माहिती दिली. यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

- Advertisement -

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान होतं म्हणून एक चहा विकणारा मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाला आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. ज्यावेळी पंतप्रधान मोदी यांची एनडीएचे प्रमुख म्हणून निवड झाली होती. त्यावेळी मोदी यांनी पहिल्यांदा भारताच्या संविधानीची पूजा केली. त्यानंतर आपलं पद स्विकारलं. पंतप्रधान मोदी नेहमी सांगतात की, कोणत्याही ग्रथापेक्षा मला संविधान मोठं आहे. मागील 10 वर्ष संपूर्ण बहुमत पंतप्रधान मोदींकडे आहे. पण मोदींनी संविधान बदलण्याचा विचार केला नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदींना गुळाची चव नाही, तशी…; ठाकरे गटाची बोचरी टीका

- Advertisement -

“संविधानाचा पाया बदलण्याचा अधिकार संसदेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे हा काँग्रेसला जुमला आहे. ज्यांना विकासाचा विचार मांडता येत नाही. जनहीताचे कार्य करता येत नाही. त्यामुळे केवळ लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हाच प्रयत्न त्यांन 2014, 2019 आणि आता 2024 ला करत आहेत. आतापर्यंत देशातील जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मतदान केले. आताही त्यांनाच लोक मतदान करतील”, असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले.

“अग्नीवीर योजना रद्द करणे म्हणजे देशाला धोक्यात टाकण्यासारखे आहे. कारण देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितले की, आमचे सैन्य युवा ठेवलं नाही तर, आम्ही लढू शकणार नाही. आज जगाच्या पाठिवर सर्वच देशातील सैन्य युवांचं आहे. पण आपल्या देशाच्या सैन्यात युवा नाही. त्यामुळे या अग्नीवीर योजनाला सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अशा म्हणण्याला काही अर्थ नाही”, अशीही टीका देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर केली.

“तुम्हाला एक लाख पाच लाख किती लिहायेचे तेवढे लिहा, पण तुमचा ट्रॅक रेकॉर्ड दाखवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 75 गॅरेंटी दिल्या आणि पूर्णही केल्या. पण काँग्रेसने छत्तीसगड, राजस्थान, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये दिलेल्या गॅरेंटी पूर्ण केलेल्या नाहीत. त्यामुळे आपल्याकडे सांगण्यासारखे काही राहिले नाही आणि त्यांना आपण निवडून येणार नाही हे माहीत असल्यामुळे राहुल गांधी असेही सांगतिल की, प्रत्येक नागरिकाला मी एक ताजमहाल बांधून देतो”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“भाजपच्या संकल्पपत्रात समाजातील सर्वांन न्याय देण्यात आला आहे. तसेच, काँग्रेसला ओबीसीवर बोलण्याचा अधिकाराच नाही. कारण देशात आणि राज्यातील ओबीसीचे कल्याण भाजप आणि एनडीएच्या सरकारने केले आहे. ओबीसीच्या आरक्षणा संविधानिक आयोग काँग्रेसने 70 वर्षांच्या काळात केला नाही. पण हा आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयार केला. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर जितकी सरकार झाली. त्यापैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये ओबीसी मंत्री हे सर्वाधिक आहेत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळातील 60 टक्के मंत्री ओबीसी, एससी, एसटी आहेत. हा आजपर्यंतचा रेकॉर्ड आहे. काँग्रेसला ओबीसीवर बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसने ओबीसींचा व्होट बँकसारखा वापर केला”, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.


हेही वाचा – LOK SABHA ELECTION 2024 : पंतप्रधान मोदींची गॅरेंटी; गरिबांना पुढील 5 वर्ष रेशनचे अन्न मोफत – फडणवीस

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -