घरदेश-विदेशLok Sabha 2024 : अमेठीतून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर राहुल गांधी...

Lok Sabha 2024 : अमेठीतून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले…

Subscribe

भिवंडी : लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम उद्या, शनिवारी जाहीर होणार आहे. देशभरातील सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. एकापाठोपाठ एक उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. अशातच उत्तर प्रदेशातील अमेठी या गांधी घराण्याच्या पारंपरिक लोकसभा मतदारसंघाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. अमेठीतून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – Deepak Kesarkar : सर्व शाळांमधील शिक्षकांना ड्रेस कोड लागू होणार; दीपक केसरकरांची माहिती

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज, शुक्रवारी निवडणूक रोख्यांबाबत (इलेक्टोरल बॉण्ड) पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना, अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, हे आमचे केंद्रीय निवडणूक समिती (सीईसी) आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जे काही आदेश देतील ते मी करेन. मी काँग्रेस पक्षाचा सैनिक आहे, जो आदेश दिला जाईल, तसे करेन, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

- Advertisement -

काँग्रेसने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, मात्र उत्तर प्रदेशात त्यांनी अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. काँग्रेसने केरळच्या वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी यांना पुन्हा तिकीट दिले आहे, मात्र राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा आहे.

हेही वाचा – Modi Road Show : काय सांगता, पंतप्रधानांच्या रोड शोला पोलिसांचा नकार; न्यायालयाकडून परवानगी

उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघ हा गांधी घराण्याची पारंपरिक सीट म्हणून ओळखला जातो. 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचा याच जागेवर पराभव झाला होता. भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी मतदारसंघातून राहुल गांधी यांचा पराभव केला. याआधी 1998मध्ये फक्त एकदाच अमेठीची जागा भाजपाने जिंकली होती. आता यावेळी भाजपाने पुन्हा एकदा स्मृती इराणी यांना अमेठीसाठी उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

हेही वाचा – EVM : ठोस काय ते बोला, आम्ही अंदाजावर काम करू शकत नाही; EVM विरोधातील याचिका फेटाळली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -