घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : वंचित सोबत हवीच..., काँग्रेसने दिली नवी ऑफर

Lok Sabha Election 2024 : वंचित सोबत हवीच…, काँग्रेसने दिली नवी ऑफर

Subscribe

काँग्रेसच्या नेत्यांकडून वंचितला आणखी एक नवी ऑफर देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकरांना आम्ही राज्यसभेवर घेऊ आणि सत्ता आली तर केंद्रात मंत्रिपदही देऊ, अशी थेट ऑफर काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागा वाटपाची चर्चा फिस्कटल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एकला चलो रे चा नारा देत स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. परंतु, यानंतरही आता वंचित मविआसोबत नाही तर काँग्रेससोबत हवीच, असा आग्रह काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. ज्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांकडून वंचितला आणखी एक नवी ऑफर देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकरांना आम्ही राज्यसभेवर घेऊ आणि सत्ता आली तर केंद्रात मंत्रिपदही देऊ, अशी थेट ऑफर काँग्रेसकडून देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 Congress has given a new offer to Vanchit Bahujan Aghadi)

वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्याकडून आतापर्यंत 20 पेक्षा अधिक जागांवर उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु, तरी देखील काँग्रेसकडून वंचितला नवी ऑफर देण्यात आली असून काँग्रेसकडून अजूनही आंबेडकर यांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेच पाहायला मिळत आहेत. नागपुरातील काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी प्रकाश आंबेडकरांना नवी ऑफर दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : जळगाव ठाकरे गटाकडे कशाला? राऊतांनी महाजनांचे नाव घेत दिले उत्तर

काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले की, लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर स्वबळावर निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला पाठिंबा द्यावा. आम्ही त्यांना राज्यसभेवर घेऊ. तसेच त्यांना केंद्रात मंत्रिपदही देऊ. याबाबतचा प्रस्ताव आम्ही त्यांना दिला आहे. हा प्रस्ताव ते स्वीकारण्याची शक्यताही आहे, अशी माहिती अहमद यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच, याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आवाहन करत म्हटले की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ओवैसीच्या एमआयएम व वंचितने मतविभाजन केल्याने भाजपाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. आजची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे, मतविभाजनाचे पाप करु नका, असे म्हणत पटोलेंकडून मैत्रीचा हात पुढे करण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर याबाबच नेमके काय उत्तर देतात? आणि कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा… Sanjay Raut : मैत्रीपूर्ण लढतीवर संजय राऊतांचे सूचक वक्तव्य, काँग्रेसला लगावला टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -