घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात शेवटच्या दिवसापर्यंत 447 उमेदवारांचे 618...

Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात शेवटच्या दिवसापर्यंत 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल

Subscribe

चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार असून यासाठी आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले आहेत.

मुंबई : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे 2024 रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 447 उमेदवारांचे 618 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 fourth phase 618 applications of 447 candidates were filed till the last day)

चौथ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदार संघात 18 उमेदवारांचे 31 अर्ज, जळगावात 24 उमेदवारांचे 36 अर्ज, रावेरमध्ये 31 उमेदवारांचे 45 अर्ज, जालनात 47 उमेदवारांचे 68 अर्ज, औरंगाबादमध्ये 51 उमेदवारांचे 78 अर्ज, मावळमध्ये 38 उमेदवारांचे 50 अर्ज, पुण्यात 42 उमेदवारांचे 58 अर्ज, शिरूरमध्ये 46 उमेदवारांचे 58 अर्ज, अहमदनगरमध्ये 43 उमेदवारांचे 55 अर्ज, शिर्डीत 31 उमेदवारांचे 40 अर्ज आणि बीड लोकसभा मतदारसंघात 76 उमेदवारांचे 99 अर्ज दाखल झाले आहेत. याआधी दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात 999 अर्ज दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या (26 एप्रिल) होणार असून यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी एकूण 352 उमेदवारांचे 477 अर्ज दाखल झाले होते. दुसऱ्या टप्प्यातील एकूण 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा 29 उमेदवारांचे 42 अर्ज, अकोला 28 उमेदवारांचे 40, अमरावती 59 उमेदवारांचे 73, वर्धा 27 उमेदवारांचे 38, यवतमाळ-वाशिम 38 उमेदवारांचे 49, हिंगोलीत 55 उमेदवारांचे 78, नांदेड 74 उमेदवारांचे 92 आणि परभणी 42 उमेदवारांचे 65 अर्ज दाखल झाले होते.

हेही वाचा – MNS : शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर, म्हणाले…

- Advertisement -

तर तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात शेवटच्या दिवशी एकूण 361 उमेदवारांचे 522 अर्ज दाखल झाले होते. तिसऱ्या टप्प्यात शेवटच्या दिवसापर्यंत रायगड लोकसभा मतदार संघात 28 उमेदवारांचे 40 अर्ज, बारामतीत 51 उमेदवारांचे 66 अर्ज, उस्मानाबादमध्ये 36 उमेदवारांचे 77 अर्ज, लातूरमध्ये 36 उमेदवारांचे 50 अर्ज, सोलापूरमध्ये 41 उमेदवारांचे 53 अर्ज, माढ्यात 42 उमेदवारांचे 55 अर्ज, सांगलीत 30 उमेदवारांचे 39 अर्ज, साताऱ्यात 24 उमेदवारांचे 33 अर्ज, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये 9 उमेदवारांचे 13 अर्ज, कोल्हापूरात 28 उमेदवारांचे 41 अर्ज आणि हातकणंगले मतदारसंघात 36 उमेदवारांचे 55 अर्ज दाखल झाले होते.

दुसऱ्या टप्प्यात आज मतदान (Voting in the second phase today)

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पारदर्शी आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक अयोग आणि पोलीस यंत्रणा सिद्ध झाली आहे. आठ मतदारसंघात जवळपास 16 हजार 589 मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या आठही मतदारसंघात संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या लक्षणीय असल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. परभणीत सर्वाधिक 42, तर त्या खालोखाल नांदेडमध्ये 31 मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे या मतदान केंद्राच्या बाहेर विशेष सुरक्षा कर्मचारी तैनात असणार आहेत.

हेही वाचा – Lok Sabha : सुळसुळीत वचननामा आणि बुळबुळीत वचने; ठाकरेंच्या जाहीरनाम्यावर भाजपाची सडकून टीका

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -