घरमुंबईMNS : शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर, म्हणाले...

MNS : शालिनी ठाकरेंच्या भूमिकेपासून मनसे चार हात दूर, म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, त्या उमेदवाराबद्दल आमची नाराजी आहे, अशी विधाने ही त्यांची व्यक्तीगत मते आहेत, असे मनसेने म्हटले आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी राज्यात शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा देणार असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केली होती. मात्र दोन दिवसांपूर्वी मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करत महाराष्ट्रद्रोही आणि भ्रष्टाचारी उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असा इशारा दिला होता. यानंतर आता मनसेकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे. (Lok Sabha Election 2024 MNS is four hands away from Shalini Thackeray’s role)

- Advertisement -

मनसे ट्वीट करताना परिपत्रकात म्हटले की, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी, महायुतीच्या उमेदवाराला आमचा पाठिंबा नाही, त्या उमेदवाराबद्दल आमची नाराजी आहे, अशी विधाने केली आहेत. पण ही विधाने पूर्णत: अप्रस्तुत आहेत. ती त्यांची व्यक्तीगत मते आहेत. त्यामुळे माध्यमांनी पण ही भूमिका पक्षाची भूमिका म्हणून बघू नये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे, असे स्पष्ट केले.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : कपटी लोकांसाठी मनसे पुढे येत असेल तर…; विनायक राऊत यांनी सुनावले

- Advertisement -

काय म्हणाल्या शालिनी ठाकरे? (Shalini Thackeray What did say?)

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी शालिनी ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले होते की, मनसेला ‘धनुष्यबाण’ चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर आता दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राज ठाकरे यांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे. इकडून तिकडून पाला पाचोळ्यासारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर यांच्यासारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये, असा इशारा शालिनी ठाकरे यांनी दिला होता.

हेही वाचा – Lok Sabha 2024: शरद पवार-सुप्रिया सुळे भाजपात आले तर? फडणवीस म्हणाले, आत्याबाईला…

काय आहे प्रकरण? (What is the matter?)

दरम्यान, राज ठाकरे काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात आपल्याला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढण्याची ऑफर होती, असा खुलासा केला होता. त्यावेळी त्यांनी असेही म्हटले होते की, एकनाथ शिंदे म्हणतात आपण एकत्र काही केलं पाहिजे. पण नक्की काय करायचं हे ते सांगत नव्हते, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली होती. यानंतर शिंदे गटात सामील झालेले रवींद्र वायकर आणि काँग्रेसने बंदी घातलेले संजय निरुपम यांना मुंबईतून उमेदवारी मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. याचपार्श्वभूमीवर शालिनी ठाकरे यांनी पक्षाच्यावतीने आपली भूमिका स्पष्ट केली होती.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -