घरमहाराष्ट्रGovinda: मी तिकीट मागितलं..; बॉलिवूड अभिनेता गोविंदाने उमेदवारीबाबत स्पष्टच सांगितलं

Govinda: मी तिकीट मागितलं..; बॉलिवूड अभिनेता गोविंदाने उमेदवारीबाबत स्पष्टच सांगितलं

Subscribe

आपण निवडणूक लढवणार की नाही, याबाबत बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

नागपूर: बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षात आठवड्याभरापूर्वीच प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आज, शुक्रवारी 5 एप्रिलला गोविंदा रामटेकमधील शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी निघाले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसंच, आपण निवडणूक लढवणार की नाही, याबाबतही भूमिका स्पष्ट केली. (Lok Sabha Election 2024 Govinda I asked for a ticket Bollywood actor Govinda spoke clearly about the candidature)

जगात डंका वाजणार

गोविंदा म्हणाले की, मी रामटेकमधील उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी जात आहे. देवाकडे आणि आईदेवीकडे प्रार्थना आहे की, आमचा उमेदवार जिंकावा. सगळं शेवटी तुमच्या कर्तृत्वावरच अवलंबून असतं. त्यामुळे रामटेकचा प्रचार करून आमचे उमेदवार राजू पारवेंना निवडून आणू आणि आमच्या नावाचा जगात डंका असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

निवडणूक लढवणार का?

रामटेकच्या सभेला जात असताना नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना, गोविंदा यांना पत्रकारांनी विचारलं की,तुम्ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. आता मुंबईतून तुम्हाला उमेदवारी मिळणार का? यावर गोविंदा यांनी आपली भूमिका स्पष्ट करत म्हटलं की, लढणार की नाही माहीत नाही, परंतु मी तरी तिकीट मागितलेलं नाही. मला एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला यासाठी मी त्यांचा आभारी आहे. मी पुन्हा एकदा नवी सुरूवात केली आहे. आतापर्यंत मी ज्या गोष्टीसाठी प्रण केला ते मला मिळालंच आहे, म्हणून आताही आमचा उमेदवार जिंकेल, अशी आशा गोविंदा यांनी व्यक्त केली.

पक्षप्रवेशानंतर गोविंदांची प्रतिक्रिया

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून मुंबईत सुशोभीकरण वाढले आहे. विकासकामांची गती वाढली आहे. मला त्यांचं आकर्षण आहे. त्यांच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मला मिळाली, त्याचा आनंद आहे, असं गोविंदा म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखीच एकनाथ शिंदे यांची प्रतिमा स्वच्छ आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Lok Sabha Election 2024 : …गिधाडांच्या वृत्तीने वागू नका; का म्हणाले बावनकुळे असं)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -