घरराजकारणBachchu Kadu On Ravi Rana: माफी मागतो आणि तोडीबाज म्हणतो, एवढा लाचार...

Bachchu Kadu On Ravi Rana: माफी मागतो आणि तोडीबाज म्हणतो, एवढा लाचार माणूस…; बच्चू कडू संतापले

Subscribe

आता त्याच भावाला तोडीबाज म्हणतात सरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो. दोन दिवसांपूर्वी माफी मागितली होती, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर केली आहे.

अमरावती:भाजपाकडून नवनीत राणा (Navneet Rana) यांनी गुरुवारी, 5 एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर पुन्हा एकदा राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. (Lok Sabha Election 2024 Bachchu Kadu Criticized Ravi Rana over Amaravati Seat BJP Candidate Navneet Rana)

दोन दिवसांपूर्वी रवी राणा म्हणत होता माफी मागतो. बच्चू कडू आमचे मोठे भाऊ आहेत. आता त्याच भावाला तोडीबाज म्हणतात सरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो. दोन दिवसांपूर्वी माफी मागितली होती, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर केली आहे. बच्चू कडूंनी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

काय म्हणाले बच्चू कडू? (Bachchu Kadu on Ravi Rana)

बच्चू कडू म्हणाले की, हात जोडून माफी मागत होते, विनंती करत होते, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात म्हणत होता. आज त्याच भावाला पैसे खातो म्हणता. सरडा तरी वेळाने रंग बदलतो? आता लगेच यावरून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा आमच्याबरोबर असा वागतो मग सामान्य लोकांबरोबर कसं वागणार? हरलेल्या मानसिकतेतून त्यांचं हे वाक्य आलं आहे. हार नक्की आहे. तुमच्या र‌ॅलीतून अर्धे मते आम्हालाच मिळणार आहेत. ते कसे गेले, का गेले हे आम्हाला माहीत आहे.

सभा मोठ्या होतील कदाचित, पण मतं अर्धही मिळणार नाहीत. मतदाताच नाही. ही संपलेली गोष्ट आहे. आनंदराव आंबेडकर यांच्या क्रमांकाच्याखाली जाऊन बसतील. नवनीत राणआ चौथ्या क्रमांकावर राहतील, असं ते म्हणाले.

- Advertisement -

रवी राणा यांच्या एवढा लाचार माणूस हिंदुस्थानात पाहिला नाही. ते मोठा भाऊही म्हणतात आणि माफीही मागतात. त्यांनी, भाजपा, राष्ट्रवादीबरोबर सेटलमेंट केली. विधानसभेसाठी सेटलमेंट केली. मला त्यांचे काळ धंदे बाहेर काढायला लावू नका. त्यांची जुनी सवय आहे. नसलेल्या, उखरून काढलेल्या, अस्तित्वात नसलेल्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी आम्ही छाती फाडून तयार आहोत, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली.

(हेही वाचा: Lok Sabha : उमेदवारी मागे घेतल्यानंतर पाठिंबा; आनंदराज आंबेडकरांची वंचितच्या पत्रावर आगपाखड)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -