घरमहाराष्ट्रPolitics : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांना...; गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर...

Politics : भगवा आतंकवाद म्हणणाऱ्यांना…; गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देताना सातपुतेंचा प्रणिती शिंदेंवर निशाणा

Subscribe

सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असल्याने दोघांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाही दिसत आहेत. आज सुशीलकुमार शिंदे यांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देताना राम सातपुते यांनी पुन्हा एकदा प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Lok Sabha Election 2024 Maharashtra Politics To those who call saffron terrorism Ram Satpute targets Praniti Shinde while wishing Gudi Padwa)

आज राज्यभरात गुढी पाडवा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पण दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामुळे उमेदवार गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी आज आपल्या निवासस्थानी सप्तनिक गुढी उभारली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि प्रतिस्पर्धी उमेदवार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, गुडीपाडवा हा आनंदाचा क्षण आहे. त्यामुळे मी संपूर्ण सोलापूरकरांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. येणारे वर्ष आपल्या सर्वासाठी आनंद घेऊन येवो याचं शुभेच्छा मी या निमित्ताने देतो.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जिथे ताकद नाही त्याच जागा काँग्रेसच्या पदरी; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराज

राम सातपुते म्हणाले की, या देशाला वैभव पुन्हा प्राप्त व्हावे, सोलापूरचा विकास व्हावा, सोलापुरात विमानतळ, आयटी पार्क सुरू करण्याचा संकल्प आहे. हा हिंदूचा सण आहे. परंतु प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या वडिलांनी भगवा आतंकवाद शब्द वापरला होता. पण हिंदू सहिष्णू आहेत, ही गुढी म्हणजे भगवा आहे, त्यांनी काही म्हटलं तरी या हिंदू नववर्षाच्या त्यांना देखील आम्ही शुभेच्छा देतो, असे म्हणत राम सातपुते यांनी नाव न घेता सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

निवडणुकांमध्ये आम्हाला प्रेम मिळेल

राम सातपुते म्हणाले की, विधानसभेत मी सर्वांचेच प्रश्न मांडले आहेत. रात्री 11 पर्यंत थांबून मराठा समाजाचे प्रश्न मांडले आहेत. मराठा आणि ओबीसीसह सर्वच समाज माझ्यासोबत आहे. पाचशे वर्ष तंबूत असलेल्या श्रीरामाची मूर्तीची प्रतिष्ठापना या वर्षात झाली आहे. पंतप्राधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर आणि काशी विश्वनाथ कोरिडोर करत अभिमानाचे वर्ष केलं आहे. त्यामुळे सोलापूरकरांचं आमच्यावर प्रेम आहे आणि निवडणुकांमध्ये हे प्रेम आम्हाला मिळेल, असा विश्वास राम सातपुते यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : चंद्रपूरच्या सभेतील आपल्या आरोपांवर मुनगंटीवार ठाम, काँग्रेस आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -