घरताज्या घडामोडीLok Sabha 2024 : जिथे ताकद नाही त्याच जागा काँग्रेसच्या पदरी; मविआच्या...

Lok Sabha 2024 : जिथे ताकद नाही त्याच जागा काँग्रेसच्या पदरी; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराज

Subscribe

Lok Sabha Election 2024 सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचे आता निश्चित झालं आहे. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेदरम्यान, सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देण्यात आला. सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींशीही वारंवार चर्चा केली.

मुंबई : सांगली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार असल्याचे आता निश्चित झालं आहे. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेदरम्यान, सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून सुरू असलेल्या वादाला पूर्णविराम देण्यात आला. सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींशीही वारंवार चर्चा केली. मात्र सांगलीची जागा उद्धव ठाकरेंकडे आणि भिवंडीची जागा शरद पवारांकडे गेल्याने काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले आहे. या पत्रकार परिषदेनंतर आमदार विश्वजीत कदम आणि विशाल पाटील नॉटरिचेबल झाले तर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाडही नाराज झाल्या आहे. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. (Lok Sabha Election 2024 Congress Leader Varsha Gaikwad Unsatisfied On MVA Constituency Distribution)

महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. मुंबई काँग्रेस पक्षाला समाधानकारक जागा न मिळाल्याने वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “ज्या जागा आम्ही निवडून येऊ शकतो किंवा जिथे आमची अधिक ताकद आहे, त्याच जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत. पण ज्या जागेवर आमची ताकद नाहीत त्याच जागा काँग्रेसच्या पदरी पडल्या आहेत”, अशा म्हणत वर्षा गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Thackeray Vs Modi : सूर्यग्रहण, अमावास्या आणि मोदींची सभा,असा वाईट योग बऱ्याच दिवसांनंतर देशाने पाहिला – उद्धव ठाकरे

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी दक्षिण मध्ये मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचा आग्रह होता. मात्र, या जागेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल देसाई यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. याच मतदारसंघात वर्षा गायकवाड यांचे वडिल दिवंगत एकनाथ गायकवाड हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र आता ही जागा ठाकरे गटाकडे गेल्याने वर्षा गायकवाडांसह सर्वच कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेकडे गेली. शिवसेना ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेतली, विशाल पाटील यांच्यासोबतच इतर काँग्रेस नेत्यांसोबत विश्वजीत कदम दिल्लीला गेले. तिथे त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांनी चर्चा केली.


हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीचा वाद चिघळला? काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरिचेबल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -