घरताज्या घडामोडीSangli Lok Sabha : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले...

Sangli Lok Sabha : काँग्रेस नेत्यांच्या नाराजीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

Subscribe

Lok Sabha Election 2024 महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागावाटपाचा (Lok Sabha Election 2024) फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार, शिवसेना (ठाकरे गट) 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे.

मुंबई : महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागावाटपाचा (Lok Sabha Election 2024) फॉर्म्युला निश्चित झाला आहे. मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यानुसार, शिवसेना (ठाकरे गट) 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होताच, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अगदी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांपासून वर्षा गायकवाडांपर्यंत सर्वांनीच नाराजी व्यक्त केली. यावर आता प्रथमच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Lok Sabha Election 2024 Sangali Constitution Nana Patole Reply On Congress Workers)

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

“हायकमांडच्या आदेशाच सगळे पालन करतील. लोकशाही, संविधान वाचवण्याची ही निवडणूक आहे. त्यांचे समाधान आम्ही करु. आजचा दिवस हा गुढी पाडव्याचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मविआने जे निर्णय घेतले ते महाराष्ट्राच्या हिताचे, शेतकरी, तरुण, गरीब वर्ग यांचं हित डोळ्यासमोर ठेऊन घेतले. भाजपाच तानाशाही सरकार शेतकरी, तरुण, गरीब यांना संपवून मूठभर उद्योगपतींसाठी काम करत आहे. भाजपाचा पानिपत करण्याचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेने घेतला आहे. फडणवीस नाही, इंडिया आघाडी विजयाची गुढी उभारेल. सांगलीत कुठलाही वाद नाही”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली. Lok Sabha Election 2024

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : सांगलीचा वाद चिघळला? काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील नॉटरिचेबल

महाविकास आघाडीची आज मुंबईत पत्रकार परिषद झाली. यावेळी सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सांगली मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या विशाल पाटील यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी यासाठी विश्वजीत कदम यांनी दिल्ली गाठली होती. मात्र, आता विश्वजीत कदम यांची दिल्लीवार फेल ठरल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. Lok Sabha Election 2024

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : जिथे ताकद नाही त्याच जागा काँग्रेसच्या पदरी; मविआच्या जागावाटपावर वर्षा गायकवाड नाराज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -