घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : मविआतील जागावाटपाचा तिढा सुटेना, नाना पटोले म्हणतात -...

Lok Sabha 2024 : मविआतील जागावाटपाचा तिढा सुटेना, नाना पटोले म्हणतात – आग्रही राहू नये…

Subscribe

जागावाटपाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. जिथ उमेदवार नाही, मेरिट नाही तिथे आग्रही राहू नये, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काहीच दिवस शिल्लक आहेत. परंतु, अद्यापही महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटू शकलेला नाही. वाटाघाटीच्या या चर्चेत अद्यापही चार ते पाच जागांवरून तिढा कायम आहे. याच मुद्द्यावरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. जिथ उमेदवार नाही, मेरिट नाही तिथे आग्रही राहू नये, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे नाना पटोले यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024 Nana Patole clarified stance Congress regarding allocation of seats in MVA)

हेही वाचा… Congress News : काँग्रेसच्या प्रचार समिती व समन्वय समितीची बैठक संपन्न, घेतले महत्त्वाचे निर्णय

- Advertisement -

मुंबईतील टिळक भवन येथे आज बुधवारी (ता. 03 एप्रिल) काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सांगलीच्या जागेवर संध्याकाळी बैठक आहे. सांगलीची जागा आम्हाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेवर संध्याकाळी बैठक होईल. आज हा विषय आमच्याकडून संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही मैत्रीचा हात पुढे करतो, तेव्हा निभावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही त्यांच्याहून जास्त हार्ड बोलू शकतो. परंतु आम्ही काँग्रेसी आहोत. सांगली, भिवंडी आणि मुंबईतल्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. चर्चेतून मार्ग काढला जाईल. आज या जागांचा निर्णय होईल अशी अपेक्षा असल्याचे पटोले यांच्याकडून सांगण्यात आले.

तसेच, जिथे उमेदवार नाही, मेरिट नाही तिथे आग्रही राहू नये ही आमची भूमिका आहे. भाजपाला हद्दपार करण्यासाठी आम्ही लढत आहोत. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत. ते काँग्रेसची भूमिका समजून घेतील. महाविकास आघाडीत कोणाला जास्त जागा मिळाली हे महत्त्वाचे नाही. आकडे महत्त्वाचे नाही. मेरिटच्या आधारे आम्ही काम करतोय. आम्ही कुणाकडे मैत्रीचा हात पुढे करत असू तर मैत्री पूर्णपणे निभावण्याचा प्रयत्न करतो, असे नाना पटोलेंनी स्पष्टपणे सांगितले.

- Advertisement -

तर, वर्ध्याला शरद पवारांकडे उमेदवार नव्हते, तिथे आमचा उमेदवार त्यांनी घेतला. ज्याठिकाणी मेरिट नाही तिथे आग्रही राहू नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. भाजपाला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे या आधारे हे निर्णय व्हायला हवेत. अजूनही सामोपचाराने चर्चा करायला तयार आहोत. जागावाटपाचा वाद सामोपचाराने सोडवू. जागावाटपाचा हा शेवटचा टप्पा असेल. उद्धव ठाकरे शिवसैनिक आहेत ते त्या भाषेत बोलतील. आम्ही काँग्रेसी आहोत, आम्ही आमच्या भाषेत बोलू. भाजपाला हरवण्यासाठी मेरिटवर निर्णय घ्यावा हीच आमची भूमिका राहिली आहे, असे नाना पटोले यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

यावेळी त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावरही भाष्य केले. महाराष्ट्रातल्या पाच जागांवर पहिल्या टप्प्यात प्रचार सुरू झाला असून इथे महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील, असे वातावरण आहे. जनतेने ही निवडणूक हाती घेतली आहे. राहुल गांधी यांच्या आवाहनाला राज्यातील जनता साथ देत आहे. प्रकाश आंबेडकर हे भाजपाला नुकसान पोहचवणार आहेत. संविधान बचावासाठी जे लढतायेत त्यांना साथ मिळेल. जे संविधान वाचवण्यासाठी येतायेत त्यांच्यासोबत काँग्रेस आहे. उद्या मी अकोला इथे उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी जाणार आहे. प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर तिथेच उत्तर देईन, असा इशाराच पटोले यांच्याकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा… Congress News : तुमची ऊर्जा, स्टेशनरी पक्ष वाचवण्यासाठी वापरा; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -