घरक्राइमMumbai Local : लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

Mumbai Local : लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

Subscribe

बई लोकलने प्रवास करताना अनेकदा महिलांची छेड काढल्याच्या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावरही यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनच्या महिला डब्यात आणि स्थानकांवर रेल्वे पोलिसांची भरती करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही मुंबी लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मुंबई : मुंबई लोकलने प्रवास करताना अनेकदा महिलांची छेड काढल्याच्या घटना घडल्या आहेत. सोशल मीडियावरही यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाले आहे. या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनच्या महिला डब्यात आणि स्थानकांवर रेल्वे पोलिसांची भरती करण्यात आली आहे. मात्र असे असतानाही मुंबी लोकलमध्ये 15 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नूर अहमद असे त्या व्यक्तीचे नाव आहे. नूर हा एका पीडित मुलीची छेड काढत असल्याचे दिसताच लोकलमधील इतर प्रवाशांनी त्याला मारहाण केली. या मारहाणीत नूर जखमी झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (mumbai local a man who attempt to kiss 15 year old girl in local Accused in custody)

नेमकं प्रकरण काय?

पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकातील पाच क्रमांक प्लॅटफॉर्मवरून नूर अहमद याने बोरिवलीला जाणारी लोकल पकडली. त्याच लोकलमध्ये पीडित मुलगी आणि तिचे वडिलही बसले होते. ही पीडित मुलगी आपल्या वडिलांसोबत घरी जात होती. ही लोकल दादर स्थानकातून पुढे जाताच नूर त्या मुलीच्या बाजूला येऊन बसला. त्यावेळी लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत नूरने त्या पीडित मुलीची छेड काढत तिचे चुंबन घेण्याचा त्याने प्रयत्न केला. अनुचित स्पर्शसुद्धा केला.

- Advertisement -

हेही वाचा – AC Local Train Fare : उकाडा वाढताच AC लोकलची भरभराट; एकाच दिवसात इतक्या पासांची विक्री

आपल्या मुलीला एक अनोळखी व्यक्ती अनुचित स्पर्श करत असल्याचे समजताच पीडित मुलीच्या वडिलांनी नूर याला मारहाण केली. लोकलमधील इतर प्रवाशांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी नूर अहमदला अंधेरी स्थानकात उतरवून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, वडिलांनी केलेल्या मारहाणीत नूर अहमद प्रचंड जखमी झाला होता. त्यामुळे त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सोमवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर नूर अहमदला अटक करण्यात आली.

- Advertisement -

पोलिसांच्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या दादर ते अंधेरी स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. शनिवारी 30 मार्च रोजी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तसेच, नूर याला अटक करण्यात आली असून पोलिसांनी नूरची अधिक चौकशी केली. त्यावेळी याआधीही नूर अहमद याला अशाच गुन्ह्याखाली अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे नूर अहमद हा अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले.


हेही वाचा – Pune Crime : प्रेमसंबंध संपवल्याच्या रागात 11वीच्या मुलीवर कोयत्याने हल्ला; आरोपी अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -