घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : 'त्या' 23 जागांबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार; म्हणाले,...

Lok Sabha Election 2024 : ‘त्या’ 23 जागांबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार; म्हणाले, काँग्रेसने तर…

Subscribe

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या त्या 23 जागांबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला आरसा दाखवला आहे. तर सोबतच त्यांनी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनाही सुनावलं आहे.

मुंबई: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा लोकसभेच्या त्या 23 जागांबाबत वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाला आरसा दाखवला आहे. तर सोबतच त्यांनी काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनाही सुनावलं आहे. राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. (Lok Sabha Election 2024 Sanjay Raut reiterates about those 23 seats He said Congress not won one place)

काँग्रेसने एकही जागा जिंकली नाही

कोण किती जागा लढवणार हे दिल्लीमध्ये ठरणार आहे. आम्ही जिंकलेल्या 18 जागांवर चर्चा करायची नाही, हे आधीच ठरलेलं आहे. काँग्रेसच्या जागांवर बोललं जात आहे. काँग्रेसने एकही जागा जिंकलेली नाही. परंतु तरीही आम्ही मविआ म्हणून एकत्र आहोत, त्यामुळे जिथे काँग्रेसची ताकद तिथे काँग्रेस निवडणूक लढवेल. आम्हीही त्यांची मदत घेऊ. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला दिल्लीमध्ये ठरणार आहे. उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. आमच्यात चर्चा सुरू आहे. मतभेद असण्याचं कारण नाही, असे संजय राऊत म्हणाले. संजय निरुपम कोण आहेत? काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे, आम्ही त्यांच्याशी चर्चा करू, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisement -

(हेही वाचा: Gautam Adani Meet Sharad Pawar: गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; सुप्रिया सुळेही हजर, चर्चांना उधाण )

वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये घेण्याच्या चर्चा वारंवार होत असतात. यावर बोलताना, राऊतांनी सांगितलं की, वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे तसंचं, काँग्रेसच्या दिल्लीतील मंडळींनीही संमती दिली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

मचा पक्ष तर फुटला नव्हता- राऊतांचा टोला

राऊत म्हणाले की, काही जण आमचा पक्ष फुटला आहे. यावर वारंवार बोलतात. परंतु, त्यांचा पक्ष तर फुटला नव्हता ना. काँग्रेसमध्ये तर फूट नाही. मग असं असताना राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेस का निवडून आली नाही, असा सवाल त्यांनी केला. तसंच, राऊत म्हणाले की, फूट पडल्यानंतरही आम्ही अंधेरी बाय इलेक्शन जिंकलो होतो. इतकंच काय तुम्ही आमच्या मदतीने कसबाची एक सिटही जिंकले होते, असं म्हणत राऊतांनी सगळच काढलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -