घरमहाराष्ट्रLok Sabha Election 2024 : 2 कोटींच्या गाडीत फिरायचं अन्...; बच्चू कडूंची...

Lok Sabha Election 2024 : 2 कोटींच्या गाडीत फिरायचं अन्…; बच्चू कडूंची नवनीत राणांवर सडकून टीका

Subscribe

अमरावती : नवनीत राणा यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात अल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. याशिवाय प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. ते वारंवार नवनीत राणा यांच्यावर टीका करत आहेत. तसेच त्यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अमरावतीतील राजकीय वातावरण तापले आहे. अशातच आता बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वीच राणा दाम्पत्याने मेळघाटमध्ये आदिवासी महिलांनी साड्या वाटल्या होत्या. याचपार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी निशाणा साधताना म्हटले की, 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी वाटायची, असा टोला लगावला आहे. (Lok Sabha Election 2024 Traveling in a 2 crore car Bachu Kadu bitterly criticized Navneet Rana in Amravati Lok Sabha constituency)

हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपाने ईव्हीएम हटवण्याची हिंमत दाखवावी; संजय राऊतांचे आव्हान

- Advertisement -

दिनशे बुब यांच्या प्रचारार्थ प्रहार संघटनेकडून कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बच्चू कडू यांनी म्हटले की, राणा दाम्पत्यांनी 17 रुपयांची साडी देऊन मेळघाटची बेईज्जती केली आहे. 2 कोटींच्या गाडीत फिरायचं आणि 17 रुपयांची साडी वाटायची. त्यामुळे 17 रुपयांच्या साडीने लोकांना गुलामीकडे नेण्याची व्यवस्था करायची आहे. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की आपल्याला ही व्यवस्था तोडून टाकावी लागेल. त्यासाठी बलिदान द्यावं लागलं तरी चालेल.

महायुतीत झालेल्या निर्णयांबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, आम्हाला काहींचा निरोप होता की, तटस्थ राहायचं, न इधर, ना उधर, परंतु, मला सांगायचं आहे की, निवडणुकीच्या वेळी वाटलेली 17 रुपयांची साडी लोकांचं मतपरिवर्तन करू शकत नाही. या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजांचा इतिहास आहे. आपल्या छत्रपतींनी अनेक आव्हानं तोडून, मोडून परतवून लावली होती. हा संत गाडगेबाबांचा जिल्हा आहे. इथले लोक 17 रुपयांच्या साडीमुळे गुलामीकडे जाणार नाहीत, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

- Advertisement -

हेही वाचा  – Congress : प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसला दिलासा; निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई नाही

महिलांकडूनही निकृष्ट दर्जाच्या साड्या मिळाल्याचा आरोप

दरम्यान, राणा दाम्पत्य दरवर्षी मेळघाटमधील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करतात. यंदा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच राणा दाम्पत्याने होळीपूर्वी मेळघाट येथे जाऊन आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांनी तेथील महिलांना साड्यांचे वाटप केले. मात्र राणा दाम्पत्याने दिलेल्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचा आरोप तेथील महिलांनी केला होता. याशिवाय त्या साड्या पाहून आदिवासी महिला संतापल्या होत्या. याचपार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -