घरमहाराष्ट्रनाशिकLok Sabha Election 2024 : राज्यव्यापी अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार -...

Lok Sabha Election 2024 : राज्यव्यापी अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार – संजय राऊत

Subscribe

ज्या रामासाठी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष संघर्ष केला आणि युद्ध केले. त्यासाठी रामाने मंदिरात जाण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येची निवड केली, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

नाशिक : आज ठाकरे गटाचे नाशिकमध्ये राज्यव्यापी अधिवेशन होणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्ताने राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी 10 वाजता बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करून राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता नाशिक येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. आजच्या राज्यव्यापी अधिवेशनातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहोत, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

आजपासून ठाकरे गटाच्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचे रणशिंक फुंकले जाईल. कारण पंतप्रधान मोदींनी अयोध्येत निवडणुकीचे रणशिंक फुंकले असेल, तर नाशिकच्या पंचवटीत रामायण घडले. त्या ठिकाणाहून रामाच्या रणक्षेत्रातून आम्ही निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक यांच्या उपस्थितीत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आम्ही राममय आहोत. काही लोक मोदीमय आहेत. हाच फरक आहेत. रामाच्या निमित्ताने एका विशिष्ट वर्गाला मोदीमय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे लोकशाहीत योग्य नाही.”

- Advertisement -

हेही वाचा – Ncp Crisis : अजितदादांनंतर आता तटकरे शरद पवार गटाच्या निशाण्यावर

बाळासाहेबांचे विचार आमच्या पाठिशी

आज बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आणि नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन आहे? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे. बाळासाहेब असतानाही आम्ही त्यांचा जन्मदिवस साजरा करत होतो आणि आज बाळासाहेब आमच्यासोबत नसले, तरी त्यांचे अस्तित्व आणि विचार आमच्या पाठिशी आहेत. ते गृहीत धरून बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस वेगवेगळ्या माध्यम आणि उपक्रमातून आम्ही साजरा करत असतो.”

- Advertisement -

हेही वाचा – Weather Update : उत्तर भारतामध्ये पारा घसरला; धुक्यामुळे वाहतुकीवरही परिणाम

रामासाठी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष संघर्ष केला

संजय राऊत म्हणाले, “यंदाचा बाळासाहेबांचा जन्मदिवस विशेष आहे. कारण योगायोग असा की, काल प्रभू श्री राम यांची प्राणप्रतिष्ठा झाली. हे सर्व रामाने योजले आहे. ज्या रामासाठी बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वर्ष संघर्ष केला आणि युद्ध केले. त्यासाठी रामाने मंदिरात जाण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येची निवड केली. यामुळे आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आरती पूजा केली. आज अधिवेशन आहे. बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये राहून आम्ही सर्व गोष्टी करत आहोत आणि हे सहज घडते.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -