घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : चिंता व्यक्त करत सुषमा अंधारेंनी सदाभाऊ खोतांना दिल्या...

Lok Sabha 2024 : चिंता व्यक्त करत सुषमा अंधारेंनी सदाभाऊ खोतांना दिल्या शुभेच्छा

Subscribe

सदाभाऊ खोत यांचे मनःपूर्वक अभिनंदन. किमान घटक पक्षातील एक पठ्ठ्या तरी आहे, ज्याने अत्यंत प्रामाणिकपणे ईडी ही भाजपाची घरगडी आहे, हे मान्य केले, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

मुंबई : विरोधी पक्षनेत्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी तशी जाहीर कबुली देखील दिली आहे. याच अनुषंगाने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी चिंता व्यक्त करत, खोत यांना शुभेच्छा दिल्या आहेत. (Lok Sabha Elections 2024: Sushma Andhare expressed concern about Sadabhau Khot)

रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत हे कायम वादग्रस्त विधाने करून वादाच्या भोवऱ्यात असतात. ते प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य करतात. अलीकडेच माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारसभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत, हे म्हातारे खूप खडूस आहेत. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून हिंडत असतात. उपमुख्यमंत्री अजित पवार हे किल्लीकडे बघून बघून म्हातारे झाले, अशी टीका त्यांनी केली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Onion export : …मग उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे ढोल बडवा, ठाकरे गटाने मोदी सरकारला सुनावले

याच सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करताना भाजपाच्या विरोधकांबद्दलच्या ईडी रणनीतीबद्दलचा उल्लेख केला. काहीही असो फडणवीस यांना मी खूप मानतो. काही जरी झाले तर ते ईडी मागे लावतात, असे लोक म्हणतात. मी तर म्हणतो ईडीच्या ससेमिऱ्याची गती वाढवायला पाहिजे. गडी एकतर आपल्याबरोबर आला पाहिजे किंवा तो आपल्याकडे आला नाहीतर भीतीने मेला पाहिजे, असे ते म्हणाले.

- Advertisement -

हाच संदर्भ देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट केले आहे. सदाभाऊ खोत यांचे मनःपूर्वक अभिनंदन. किमान घटक पक्षातील एक पठ्ठ्या तरी आहे, ज्याने अत्यंत प्रामाणिकपणे ईडी ही भाजपाची घरगडी आहे, हे मान्य केल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. सदाभाऊ यांची मला काळजी वाटते, आता ‘ते’ लोक कदाचित त्यांना राजकारणातून संपवून टाकतील, अशी भीती व्यक्त करतानाच, खोत यांनी काळजी घ्यावी, बहिण म्हणून त्यांना सदिच्छाच असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : अजित पवार धमकीबहाद्दर, मोदींनी त्यांच्यावर कारवाई करावी; संजय राऊतांची टीका


Edited by Manoj S. Joshi

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -