घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, संजय निरुपम यांच्याही...

Lok Sabha 2024 : काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, संजय निरुपम यांच्याही नावाचा समावेश

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला पार पडणार असून याच्या प्रचाराला देखील सुरुवात झाली आहे. शिवसेना, भाजपा, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या स्टार प्रचारकांच्या याद्या काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेसने देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या यादीत संजय निरुपम यांच्या नावाचाही समावेश करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Lok Sabha: List of star campaigners of Congress announced, Sanjay Nirupam’s name included)

हेही वाचा… Prithviraj Chawan : साताऱ्यातून पृथ्वीराज चव्हाणांचे नाव चर्चेत, पण निर्णय शरद पवारांकडे

- Advertisement -

महाविकास आघाडीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे यांना सोडण्यावरून काँग्रेस नेतृत्वावर तोंडसुख घेणारे मुंबई विभागीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. निरुपम हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. ठाकरे गटाने येथून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. कीर्तिकर यांच्या उमेदवारीवरून निरुपम प्रचंड संतापले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीत निरुपम यांचा समावेश करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसने महाराष्ट्रात 19 एप्रिलला होऊ होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाला सादर केली आहे. या यादीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण आदींचा समावेश आहे.

- Advertisement -

त्याशिवाय अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील, राज्यसभा सदस्य चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, शिवाजीराव मोघे, नसीम खान, अमित देशमुख, नितीन राऊत, वसंत पुरके, माजी राज्यमंत्री विश्वजित कदम, कुमार केतकर, भालचंद्र मुणगेकर, कन्हैया कुमार आदींना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -