घरमहाराष्ट्रLok Sabha : बीडमध्ये प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे? फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर चर्चांना...

Lok Sabha : बीडमध्ये प्रीतम मुंडे की पंकजा मुंडे? फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर चर्चांना उधाण

Subscribe

मुंबई : निवडणूक आयोग कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच पक्षांनी प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी सुरू केली असून जागावाटपासंदर्भात बैठक घेत आहेत. अशातच भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा असलेल्या पंकजा मुंडे यांनी त्यांची बहिण प्रीतम मुंडे यांच्यासोबत नवी दिल्ली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वीस मिनिटे बैठक झाली. बैठकीचे कारण अस्पष्ट असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रीतम मुंडे तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की, 2019 मध्ये पराभूत झालेल्या पंकजा मुंडे यांना संधी मिळणार हे पाहावे लागेल. (Lok Sabha  Pritam Munde or Pankaja Munde in Beed Discussions sparked after meeting with Devendra Fadnavis)

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून इशारा; अजित पवार-पाटील संघर्ष पेटणार?

- Advertisement -

बीडच्या लोकसभा जागेवर भाजपाचे वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे याठिकाणी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोणाला संधी मिळणार? याची राजकीय वर्चतुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघांमध्ये 2019 मध्ये पराभव झाला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना आमदारकीसाठी संधी मिळाली नाही. याशिवाय नुकत्याच राज्यसभा निवडणुकीसाठीही पंकजा मुंडे यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपामध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू आहे.

दुसरीकडे भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पश्चात त्यांची कन्या आणि पंकजा मुंडे यांची बहिण डॉ. प्रीतम मुंडे यांनी 2014 च्या पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा प्रीतम मुंडे यांना संधी देणार की, पंकजा मुंडे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संधी देणार हे पाहावे लागेल.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : रितेशचे काका-पुतण्याच्या नात्यावर भाष्य; अजित पवारांना लगावला टोला?

लोकांना मला कुठे बघायचे आहे हे महत्त्वाचे – पंकजा मुंडे

दरम्यान, भाजपकडून सध्या ‘गाव चलो’ अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने पंकजा मुंडे या बीडच्या पौंडूळ गावात आठवड्याभरापूर्वी मुक्कामासाठी होत्या. यावेळी त्यांना माध्यमांनी विचारले की, तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायला आवडेल की, राज्यसभेत जाणे पसंत कराल? या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, लोकसभा की राज्यसभेवर जायचं हा चॉईस ठरवायला आता फार उशीर झाला आहे. मला कुठे जायला आवडेल, यापेक्षा लोकांना मला कुठे बघायचे आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांना मला जिथे पाहायला आवडेल, तिथे मी दिसेल, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट असेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -