घर उत्तर महाराष्ट्र नव्या संसाराला लागली नजर; त्याने आधी तीला क्रूरतेने संपवले, नंतर स्वतःही चढला...

नव्या संसाराला लागली नजर; त्याने आधी तीला क्रूरतेने संपवले, नंतर स्वतःही चढला फासावर

Subscribe

नाशिक : नाशिक शहरात नेमके चालले काय ? असा प्रश्न उपस्थित होतोय. अगदी कालच नाशिक रोड परिसरातील एका आठ दिवस बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह सापडला होता. त्यामागे पत्नीच्या अनैतिक संबंधाचा धागा होता. तसेच दोन महिन्यांपूर्वी सिडको परिसरात झालेल्या युवकांच्या आत्महत्येमागे देखील पत्नी आणि सासरच्या मंडळींकडून त्रास झाल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच अजून एक पती पत्नीच्या नात्याबाबत धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नी पहाटे झोपेत असताना तिच्या डोक्यात मुसळी टाकून आधी तिला संपवले नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे.

 नाशिक शहरातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत इच्छामणी नगर परिसरात राहणाऱ्या विशाल निवृत्ती घोरपडे या युवकाने आपली पत्नी प्रिती विशाल घोरपडे हिच्या डोक्यात पहाटेच्या वेळी ती झोपेत असताना मुसळी घालून तिची क्रूरतेने हत्या केली आहे. तीचा जीव घेतल्यानंतर विशालने स्वता देखील गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही सर्व घटना सकाळी 7 वाजेच्या सुमारास उघड झाली. झालेला प्रकार समजल्यानंतर दोघांचेही कुटुंबीय त्याठिकाणी दाखल झाले. मात्र, विशालने नेमके प्रीतीला का मारले आणि त्यानंतर स्वताला का संपवून घेतले याबाबत कोनीतीही माहिती समजू शकलेली नाही. त्यामुळे या घटनेबाबत मोठे गूढ निर्माण झाले आहे.

- Advertisement -

अलीकडेच कौटुंबिक वादातून थेट कोणालातरी संपवण्याचे प्रकार वाढत चालले आहे. कौटुंबिक वाद, पती पत्नीचा वाद यातून अशा घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास पतीने पत्नीची हत्या करत स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. झोपेत असतानाच पतीने पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आलं आहे. तर त्यानेही घरातच गळफास घेत स्वतःला संपविले आहे. घटनेने कुटुंबावर मोठा आघात झाला असून घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -